मुंबई : लहाणपनाचं आकर्षण प्रत्येकाला असतं. त्यामुळे बालपणानतला एक जरी फोटो सोपडला की चर्चा सुरू होते. कलाकारांचं देखील तसंच आहे. सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. ही चिमुकली आजची फक्त प्रसिद्ध अभिनेत्री नाही राजकारणी व्यक्ती देखील आहे. त्यामुळे हा फोटो पाहाणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न पडला असेल ही चिमुकली नक्की आहे तरी कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोबद्दल महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, हा फोटो एका अभिनेत्री किंवा राजकारणी व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला नाही, तर त्यांच्या मुलाने त्याच्या आईचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला. 


फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'माझी आई...' असं लिहिलं. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोवर युजर्स कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. 



या फोटोमध्ये दिसणारी चिमुकली ही बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आणि भाजपा खासदार किरण खेर आहेत. त्यांच्या मुलाचं नाव सिकंदर खेर आहे. फोटो आणि कॅप्शनमधून सिकंदरचं त्याच्या आईवर असलेलं प्रेम दिसून येत आहे. 


किरण खेर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्या लवकरचं  'इंडिया गॉट टॅलेंट सीजन 9' मध्ये जजची धूरा सांभाळताना दिसतील. यावेळी अभिनेत्री किरण खेर, रॅपर बादशाह आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी शो जज करताना दिसणार आहेत.