बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाली माझ्या पतीने मला शारिरीक संबध...`
रंगणाऱ्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीने सेल्फ लव्ह आणि इंटिमेट सीनबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे. जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसत आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आता इंटिमेट सीन (Intimate scenes) कॉमन आहेत. अनेक आभिनेत्री मर्यादा ओलांडून आणि सिनेमाच्या कथेसाठी इंटिमेट आणि किसींग सीन देण्यास मागे पाहिलं नाही. अशाच अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री किर्ती कुल्हारी (Kirti Kulhari). किर्ती सध्या 'फोर मोर शॉट्स प्लीज' (Four More Shots Please!) सीरिजमुळे चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीने सेल्फ लव्ह आणि इंटिमेट सीनबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे.
सध्या ती तिच्या 'फोर मोअर शॉट्स प्लीज' या वेब सीरिजच्या पुढच्या सीझनसाठी चर्चेत आहे. यावेळी अभिनेत्रीने सेल्फ लव्ह आणि पडद्यावरील इंटिमेट सीनबद्दल आपलं मत मांडलं.
तिने सांगितलं की, ती आयुष्यभर प्रेम शोधण्याचा प्रयत्न करत राहिली. तिने इतरांच्या प्रमाणीकरणाची प्रतीक्षा केली आहे. पण आता ती स्वतःवर प्रेम करायला शिकली आहे. कीर्ती म्हणाली की, मला पहिल्यांदाच स्वतःवर प्रेम करण्याची भावना अनुभवायला मिळाली.
मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत कीर्ती कुल्हारीने 'फोर मोअर शॉट्स प्लीज' मधील तिच्या पात्राबद्दल सांगितलं. तिने पुढे सांगितलं की, फोर मोअर शॉट्स प्लीज' वेबसिरीजमधील तिच्या पात्राशी जुळवून घेण्याचं आणि पुनर्विवाहाच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचे धाडस मला पहिला पती साहिल सहगलने दिलं.' (kirti kulhari intimate scenes).
किर्तीने सांगितले की, माझं २००६ साली लग्न झालं आहे आणि मला सांगायला आवडेल की माझा एक्स पती साहिलने मला खूप सपोर्ट केला आहे. तो अशा प्रकारचा माणूस नव्हता ज्याला असुरक्षित वाटायचा किंवा तो म्हणेल की, नाही, तुम्ही किसींग सीन नाही देऊ शकत किंवा पडद्यावर शारिरीक संबधाचा सीन देऊ शकत नाही.
कीर्ती कुल्हारीने पुढे सांगितलं की, मला एक्स पती साहिल सहगलने खरोखरच आत्मविश्वास आणि पाठिंबा दिला आहे. तो नेहमी म्हणायचा की, जा आणि पात्रासाठी जे पाहिजे ते कर. 'फोर मोअर शॉट्स प्लीज'मध्ये सेक्स सीनबाबत चारही मुलींचा दृष्टिकोन खूप वेगळा होता.आहे. पण मी त्याबद्दल आरामात होते. इंटिमेट सीन हा एक अभिनेता आणि माणूस म्हणून माझ्यासाठी सशक्त क्षण होता.
'फोर मोअर शॉट्स प्लीज'
'फोर मोअर शॉट्स प्लीज' सीरिज आधुनिक जीवन जगणाऱ्या चार मुलींभोवती फिरताना दिसत आहे. आज मुली आर्थिक दृष्ट्या पतीवर अवलंबून नाहीत असं सीरिजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.