Salman Khan Lawrence Bishnoi : बॉलीवूडचा दबंग सलमान खान (Salman Khan) हा सध्या मोठ्या अडचणीतून जात आहे. गँगस्टर लॉरेंस बिष्णोईकडून (Lawrence Bishnoi)  वारंवार सलमान खान याला जीवानिशी मारण्याची धमकी दिली जात आहे. एवढंच नाही तर सलमान खानच्या जवळच्या व्यक्तींना देखील बिष्णोई गॅंगकडून धमकावलं जातंय. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानला वारंवार धमक्या दिल्या जात असताना गायक अनुप जलोटा याने सलमानला लॉरेंस बिष्णोईची माफी मागण्याचा सल्ला दिला होता. आता शेतकरी नेता राकेश टिकैत यानेही आता सलमान खानला  बिष्णोई समाजाची माफी लागण्याचा सल्ला दिला जात आहे. 


माफी मागण्याचा दिला सल्ला : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी नेता राकेश टिकैत याने सलमानला सल्ला की, त्याने बिष्णोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी तेव्हाच हे सगळं प्रकरण मिटेल. राकेश यांनी बिष्णोईचा बदमाश माणूस असा उल्लेख करत म्हंटले की, हे प्रकरण समाजाशी निगडित आहे. सलमानला मंदिरात जाऊन माफी मागितली पाहिजे, नाहीतर जेलमध्ये असल्लेया माणूस माहित नाही त्याला कधी उडवेल.  


गायक अनूप जलोटानेही सलमानला दिला होता सल्ला : 


राकेश टिकैत यांच्यापूर्वी गायक अनूप जलोटाने सुद्धा सलमान खानला सांगितले होते की, ' हा वेळ विचार करण्याचा नाही कोणी मारले आणि कोणी नाही... तुम्हाला हे कळलं पाहिजे की सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकीची हत्या ही याच कारणामुळे केली गेली आहे. हा वाद मिटविण्यावर भर दिला पाहिजे. मी सलमानला एक छोटीशी विनंती करू इच्छितो की त्याने मंदिरात जाऊन माफी मागावी आणि त्याच्या कुटुंबाचे आणि जवळच्या मित्रांचे रक्षण करावे.


हेही वाचा : शरद पवारांची गुगली! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याला मुंबईतून दिली उमेदवारी; मोठ्या नेत्याच्या मुलीविरुद्ध लढणार


काळवीटची पूजा करतो बिष्णोई समाज : 


सलमान खान आणि सध्या जेलमध्ये असलेला लॉरेंस बिष्णोई यांच्यात वाद 1998 पासून सुरु झाला. जेव्हा सलमान खान याने काळवीटची शिकार केली होती आणि त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. लॉरेंस बिष्णोईने 2018 मध्ये जोधपूर कोर्टात पेशी देताना अभिनेता सलमान खान याला जीवानिशी मारण्याची धमकी दिली होती. राजस्थानमध्ये  'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळवीटच्या शिकारीची घटना घडली. तेव्हा लॉरेंस बिष्णोई अवघ्या 5 वर्षांचा होता.  या घटनेमुळे काळवीटाची पूजा बिष्णोई समाजात संताप व्यक्त केला गेला आणि या प्रकरणात सलमान मुख्य आरोपी होता.  2018 मध्ये त्याला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते मात्र त्यानंतर न्यायालयानेही त्यांची निर्दोष मुक्तता केली.