मुंबई : शम्मी कपूर यांची पत्नी योगिता बाली या गीता बाली यांची भाची होत्या. बॉलिवूडमध्ये चाहत्यांची कमी नव्हती. असं असूनही, त्या अशा सिनेमांत दिसल्या जिथे प्रथम श्रेणीतील अभिनेत्रींना नकार देण्यात यायचा. करिअरच्या सुरुवातीच्या काळात योगिता यांना  चित्रपट दिग्दर्शकांनी बोल्ड सिम्बॉल म्हणूनच सादर केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकदा योगिता बाली यांना किशोर कुमार यांच्याबरोबर 'जमुना के तीर' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट तर अपूर्ण राहिला. पण किशोर यांच्या रसाळ स्वभावावर योगिता फिदा झाल्या,  आणि या दोघांनी लग्नगाठ बांधली. पण नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होतं.



1976 मध्ये झालेलं हे लग्न 1978 मध्ये तुटलं. असं म्हटलं जातं की, याला कारण योगिता यांची आई आहे. या दोघांच्या दैनंदिन जीवनात त्या जास्तच हस्तक्षेप करत होत्या. किशोर कुमार यांच्या सारख्या अष्टपैलू कलाकाराला हे अजिबात आवडलं नाही आणि म्हणूनच या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.


यावेळी मिथुन चक्रवर्ती यांनी बॉलीवूडमध्ये पर्दापण करत होते. मिथुनबरोबर योगिता यांच्या 'ख्वाब' चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. मिथुन यांनी आपली पहिली पत्नी हेलेना ल्यूकशी घटस्फोट घेतला होता. त्यांनाही पत्नीची गरज भासू लागली होती. मग काय, या दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. यामुळे किशोर कुमार मिथुनवर खूप चिडले आणि त्यांनी मिथुन यांच्या चित्रपटात कधीच गाणीही गायली नाहीत.



मिमोह चक्रवर्ती हा त्यांचा मुलगा आहे. त्याने चित्रपटांमध्ये एन्ट्री घेतली. पण 'हॉन्टेड' या चित्रपटाशिवाय तो कोणत्याच चित्रपटात वडिलांसारखा यशस्वी होवू शकला नाही. असं म्हणतात की मिथुन आणि योगिता यांचं देखील एकमेकांसोबत जास्त पटत नाही. मात्र मुलांसाठी ते एकाच छताखाली राहतात.


योगिताने त्यांच्या कारकीर्दीत बर्‍याच चित्रपटांत काम केलं, मात्र त्या कधीही ए ग्रेड अभिनेत्री झाल्या नाही. परवाना, मेमसाब, समझौता, झील के उस पार, धमकी, अजनबी आणि नागिन, सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांनी अमिताभ बच्चन, संजीव कुमार आणि देव आनंद यासारख्या जवळपास सर्व सुपरस्टार्सबरोबर काम केलं.