`कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा`
`कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा`
मुंबई : कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.
'अनेकांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आता मी येत्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी मुंबईत प्रवास करणार आहे. मुंबई एअरपोर्टला उतरण्याची वेळ मी तुम्हाला ठरली की सांगेन. कुणाच्या बापात हिम्मत अशेल तर मला रोखून दाखवा',असं ट्विट कंगनाने केलं आहे.
मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौत हिच्यावर सध्या सोशल मीडियावर टीकेचा भडिमार होत आहे. या पार्श्वभूमीवर कंगना राणौत हिने आणखी एक ट्विट करून विरोधकांवर पलटवार केला आहे. या ट्विटमध्ये कंगनाने म्हटले आहे की, तर आता सगळ्या गुंडांची तळपायाची आग मस्तकात केली आहे. ते वैफल्यग्रस्त झाले आहेत पण त्यांच्याकडे मांडायला कोणताही तर्कशुद्ध मुद्दा नाही. त्यामुळे हे सर्वजण माझ्याविषयी आक्षेपार्ह मिम्स तयार करत असून मला नावं ठेवत आहेत.
तसेच #KanganaPagalHai असा हॅशटॅग चालवत आहेत. या ट्विटमध्ये कंगनाने संजय राऊतांचा थेट उल्लेख केलेला नाही. मात्र, तिने ट्विटच्या शेवटी #ShameOnSanjayRaut हा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.