KL Rahul होणार बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा जावई, या अभिनेत्रीसोबत करणार लग्न
अथिया शेट्टी आणि केएल राहुल येत्या काही महिन्यात विवाहबंधनात अडकणार?
मुंबई : अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे कपल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. या लग्नात अथियाचे वडील सुनील शेट्टी (Suniel shetty) आणि आई माना शेट्टी बॉलीवूडच्या बड्या स्टार्सना आमंत्रित करणार असल्याचे मानले जात आहे. अथिया आणि राहुलचे लग्न (KL Rahul and Athiya Shetty) 5-स्टार हॉटेलमध्ये नसून शेट्टी कुटुंबाच्या खंडाळा येथील बंगल्यात होणार आहे. (SUNIEL SHETTY CONFIRMS ATHIYA AND KL RAHUL WILL GET MARRIED)
अथिया शेट्टी आणि केएल राहुल वांद्रे येथील एका अपार्टमेंटमध्ये एकत्र शिफ्ट झाल्याच्या बातम्या येत होत्या. आता दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाचे ठिकाणही निश्चित केले आहे. केएल राहुल लग्नाची तारीख निश्चित करणार आहे. राहुलच्या आगामी दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार लग्नाची तारीख ठरवली जाणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अथिया आणि राहुल सुनील शेट्टीच्या खंडाळ्याच्या बंगल्यात विवाह करणार आहेत. सुनील शेट्टीला त्याचे हे घर खूप आवडते. 17 वर्षांपूर्वी त्याने हे घर बांधले होते.
या बंगल्याबद्दल बोलायचे झाले तर हा बंगला खूप मोठ्या परिसरात बांधला आहे. हे घर उत्तम इंटीरियर डिझाइनसह अतिशय आलिशान आहे. तसेच घराभोवती हिरवळ आहे. लवकरच लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा वेळ मोकळा ठेवण्यास सांगण्यात येणार आहे.
मे 2022 मध्ये अशी बातमी आली होती की अथिया शेट्टी आणि केएल राहुल बांद्रा येथील एका घरात एकत्र शिफ्ट होणार आहेत. लग्नानंतर दोघेही ४ बीएचके घरात राहणार असल्याचे सांगण्यात आले. हे घर त्यांनी भाड्याने घेतले आहे. अथिया म्हणाली होती की इतर कोणासोबत नाही तर तिच्या कुटुंबासह नवीन घरात शिफ्ट होत आहे.
गेल्या वर्षी अथिया आणि राहुलच्या नात्याचा खुलासा झाला होता. दोघेही एकत्र वेळ घालवताना दिसले. या जोडप्याने कधीही सार्वजनिकरित्या त्यांचे नाते कबूल केले नाही, परंतु अनेकदा इन्स्टाग्रामवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.