स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील शिवरायांबद्दल जाणून घ्या
झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिका ही लोकप्रिय होत चालली आहे.
मुंबई : झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिका ही लोकप्रिय होत चालली आहे.
या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे शंतनू मोघे हे शिवबा म्हणून लोकप्रिय होत चालले आहेत. शंतनू मोघे हे सुप्रसिद्ध साहित्यिक कलाकार श्रीकांत मोघे यांचा मुलगा आहे. शंतनू मोघे यांनी अनेक मराठी नाटके आणि सिनेमे केले आहेत. रात्र वणव्याची, कॅरी ऑन मराठा, रणभूमी अश्या अनेक सिनेमांत त्यांनी काम केलाय. तर कॅच दि चान्स, बंधमुक्त, तुझसाठी प्रिया रे हि त्यांची गाजलेली मराठी नाटके. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत शिवरायांची भूमिका हि त्यांची आत्ता पर्यंतची सर्वात आवडती भूमिका असलेली मालिका.
अशी झाली शंतनू - प्रियाची ओळख
शंतनू मोघे आणि प्रिया मराठे यांचं २४ एप्रिल २०१२ रोजी लग्न झालं. कॉलेज पासूनच्या मैत्रीचे कधी प्रेमात रूपांतर झाले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. एकदा पावसाळ्यात लॉग ड्राईव्ह ला येतेस का असं शंतनूने प्रियाला विचारले आणि तीही हो म्हणाली आणि तेव्हाच त्याने तिला प्रपोज केलं तिथेच तीचा होकारही मिळवला आणि काही दिवसांतच दोघांनी लग्न केलं.
प्रिया मराठे हे हिंदी मालिकांमधील लोकप्रिय नाव. पवित्र रिश्ता आणि सात निभाना साथिया या मालिकेतून प्रिया घराघरात पोहोचली. प्रिया आणि शंतनू यांचं नातं सर्वाधिक चांगल आहे.