नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता अजय देवगनची मुख्य भुमिका असलेला, रोहित शेट्टी दिग्दर्शित सिनेमा 'गोलमाल अगेन' शुक्रवारी सिनेमा गृहात प्रदर्शित झाला आहे. गेली अनेक दिवस या सिनेमाची चर्चा होती आणि प्रेक्षकांनाही याबद्दल उत्सूकता होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन वर्षात गोलमालची सिरीज आणणाऱ्या रोहित शेट्टीने या सिनेमासाठी ७ वर्षाचा वेळ घेतला आहे. या फिल्मने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर हंगामा केला आहे. ट्रेंड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या ट्वीटनुसार या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी ३० कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे.


आतापर्यंत 'गोलमाल' ची संपूर्ण सिरीज लोकांनी डोक्यावर उचलून धरली. गोलमाल अगेन ही या सिरीजची चौथी फिल्म आहे. गोलमाल च्या संपूर्ण सिरीजची आतापर्यंतची कमाईची आकडेवारी 'गोलमाल' चे यश दाखविते. गोलमाल अगेन हा देखील फुल ऑन एंटरटेंन्मेंट असा सिनेमा आहे. यामध्ये अजय देवगण व्यतिकरीक्त अरशद वारसी तुषार कपूर, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी, वृजेश हिरजी, तब्बू आणि परिणीती चोप्रा हे कलाकार मुख्य भुमिकेत आहेत.
जमनादास आश्रमाच्या ६ मुलांवर या सिनेमाची कहाणी आधारित आहे. गोपाल (अजय देवगण), लकी (तुषार कपूर), माधव (अर्शद वारसी), लक्ष्मण १ (श्रेयस तळपदे), लक्ष्मण २ (कुणाल Kemu) आणि गर्विष्ठ तरुण (जॉनी लिव्हर) अशी जबरदस्त टीम आहे. 


सध्या आमीर खानची निर्मिती फिल्म 'सीक्रेट सुपरस्टार' ची सुरूवात चांगली झाली आहे. पहिल्याच दिवशी फिल्मने ४.८० कोटींची कमाई केली. तरीही ही फिल्म पाहिजे तसे कलेक्शन न करु शकल्याचे बोलले जात आहे. पण आमिरचा हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा चित्रपट संपूर्ण भारतात १७५० स्क्रिनवर दाखविला जात आहे.