मुंबई : मनोज वाजपेयी आपल्या प्रत्येक सिनेमातील पात्र हे  दिग्दर्शकाच्या नजरेतून साकारत असतो. मात्र काही पात्र अशी असतात जे साकारण्यासाठी तुम्ही तसेच जगत जाता. असंच एक पात्र मनोज वाजपेयी साकारणार आहे. सिनेमा गली गुलियामध्ये. या सिनेमाची फिल्म फेस्टिव्हलमध्ये भरपूर चर्चा झाली आणि मनोज वाजपेयीने साकारलेली भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली. या कॅरेक्टरने मनोज वाजपेयी यांना स्वतःला स्वतःशीच बोलण्यास भाग पाडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज सांगतात की, दीड महिना मी या सगळ्याची तयारी केली. जर तुम्ही कुटुंबासोबत राहत असाल. तू मॅसिव डाएट प्लानवर आहेस, आणि तुझी इम्युन सिस्टम संपत आहे. तसेच तू एकसारखा आजारी पडत आहेत. कारण हे डाएट असं आहे ज्यामध्ये तुम्हाला वजन कमी करावं लागतं. कालांतराने तुझी पत्नी तुला सांगते की, तू एकटाच स्वतःशी संवाद साधत असतो. हे खूप विचित्र आहे. 


हो, मी स्वतःच स्वतःशी बोलायचो. अनेकदा माझी पत्नी माझ्यासमोरून जायची आणि विचारायची. तू माझ्याशी काही बोललास का? पण मलाच कळायचं नाही की मी काही बोललो. अशाच प्रकारे मी माझ्या कॅरेक्टरमध्ये घुसत असे. अनेकदा मी स्वतः टॉर्चर करताना पाहिलं आहे.