मुंबई : तुम्ही हे पाहिलंच असेल की, बहुतेक सिनेमे हे शुक्रवारीच रिलिज होतात. असे फार कमी सिनेमे आहेत, जे शुक्रवारी रिलिज न होता मधल्याच कोणत्यातरी दिवशी प्रेषकांच्या भेटीला येतात. परंतु हे सिनेमे सोडले तर बहुतेक सिनेमे हे शुक्रवारीच का रिलिज होतात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का? आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं यावर म्हणणं असेल की, विकेंडमुळे असं केलं जातं आणि ते बरोबर देखील आहे. परंतु याव्यतिरिक्त देखील अशी अनेक कारणं आहेत, ज्यामुळे सिनेमे शुक्रवारी रिलिज केले जातात. आता ही कारणं कोणती आहेत, हे जाणून घेऊ.


कारण 1:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी भारतात सिनेमे प्रदर्शित करण्याची संकल्पना हॉलीवूडमधून आली. हॉलीवूडमध्ये 1940 च्या दशकात याची सुरुवात झाली, परंतु भारतात हा ट्रेंड 1960 च्या दशकात सुरू झाला. यापूर्वी भारतात सिनेमांचे प्रदर्शन सोमवारी होत होते.


एका मीडिया अहवालानुसार, भारतात शुक्रवारी प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा मुघल-ए-आझम होता. हा सिनेमा 5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झाला होता. ज्याने इतिहास घडवला. यानंतर शुक्रवारपासून सिनेमांचे प्रदर्शन किंवा रिलिज होणं सुरू झालं.


कारण 2 :


भारतामध्ये शुक्रवार हा शुभ मानला जातो. हा दिवस लक्ष्मीचा दिवस आहे. त्यामुळेच अधिक निर्मात्यांनी शुक्रवारीच त्यांचे सिनेमे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतात.


केवळ सिनेमाच नाही तर मुहूर्ताच्या शूटिंगसाठीही हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी सिनेमा प्रदर्शित केल्यास तो अधिक चांगली कामगिरी करेल असा निर्मात्यांना विश्वास आहे.


कारण 3 :


वीकेंडशी थेट संबंध. शुक्रवारपासून वीकेंड सुरू होत असल्याने या दिवशी सिनेमे प्रदर्शित होतात. शुक्रवार रात्र, शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस असतात, ज्यादिवशी लोक आपल्या मित्रांसोबत फिरायाला किंवा वेळ घालवायला जातात, त्यामुळे यावेळी सिनेमा पाहाणं हा एक चांगला उपाय आहे. वीकेंडला बहुतेक लोक थिएटरकडे वळतात, त्यामुळे सिनेमे अधिक चांगली कमाई करू शकतात.


शुक्रवारी सिनेमा प्रदर्शित करण्याची पद्धत प्रत्यक्षात अमेरिकन पॅटर्नवर आधारित आहे. अनेक दशकांपासून, या दिवशी सिनेमे प्रदर्शित करण्याचा अमेरिकेचा इतिहास आहे. सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर शनिवार आणि रविवारपासून चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ झाल्याचेही त्यांचे मत आहे.


अशा प्रकारे अनेक प्रकारे सिनेमांच्या प्रदर्शनासाठी शुक्रवारचा दिवस निवडला गेला. कालांतराने हा सिनेमा प्रदर्शित होण्याचा अधिकृत दिवस ठरला. परंतु, भारतात असे अनेकवेळा घडले आहे, जेव्हा सणाच्या निमित्ताने शुक्रवार सोडून इतर दिवस रिलीजसाठी निवडले गेले. जसे सलमान खान ईदच्या मुहूर्तावर देखील काही सिनेमे रिलिज करतो.