Koffee With Karan Season 8 : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण 8' हा शो चांगलाच चर्चेत असतो. या शोच्या पहिल्या एपिसोडपासून चांगलीच चर्चा आहे. आता नव्या एपिसोडनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचा प्रोमो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात करण जोहरसोबत जान्हवी कपूर आणि तिची बहीण खुशी कपूर दिसत आहेत. तर या प्रोमोमध्ये दोन्ही बहिणी या अनेक खासगी गोष्टींवर चर्चा केली आहे. त्यावेळी शिखर पहाडियासोबत असलेल्या तिच्या रिलेशनशिपवर तिनं चुकून हिंट देखील दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या प्रोमोत जान्हवी आणि खुशी स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. जान्हवीनं लाल रंगाचा गाऊन परिधान देला आहे तर खुशी कपूरनं मिडी ड्रेस परिधान केला आहे. रॅपिड फायर दरम्यान, यावेळी जान्हवीला तिच्या स्पीड डायलवर कोणते तीन लोक आहेत? असा प्रश्न करणनं विचारला. तर त्यावेळी उत्तर देत वडील बोनी कपूर, बहीण खुशू आणि ती पटकन बोलून जाते शिखू... (शिखू म्हणजे शिखर पहाडिया)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


जान्हवीला या गोष्टीची जाणीव झाली आणि त्यानंतर तिनं लगेच तोंड फिरवलं. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा होती की ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. जान्हवीनं एक किस्सा शेअर केला होता की शूटिंगच्या आधल्या रात्री, ती एका पार्टीत होती. जिथे ती सगळ्यांना सांगत होती की तिच्यासोबत रॅपिड फायर खेळा. त्यावेळी नव्या नंदानं जान्हवीची मस्करी करत सांगितले की ती कधीच हे करू शकणा नाही आणि शोमध्ये न जाण्याचा सल्ला देखील दिला. जान्हवीनं नव्या नवेली नंदाची मिमिक्री देखील केली. 


हेही वाचा : न्यू इयर पार्टीत ड्रिंक करताना दिसला आर्यन खान, ऑरीसोबत शाहरुखचा लाडका स्पॉट


तर एका सेगमेंटमध्ये खुशीला रॅपिड फायरमध्ये तिला तीन मुलांची नावं सांगायला सांगितली ज्यांना जान्हवीनं डेट केलं आहे. जान्हवीनं मस्करी करत तिच्या बहिणीला चेतावनी देत सांगितले की तिनं फक्त तीन लोकांना डेट केलं आहे. खुशीनं म्हटलं की हा एक ट्रिकी प्रश्न आहे. तर तिच्या या उत्तरानंतर प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता वाढली आहे. तर हा एपिसोड तुम्ही 4 जानेवारी रोजी डिज्नी + हॉटस्टारवर पाहू शकता.