Kota Factory Season 3 Cast Fees:  पंचायतमध्ये साकारलेल्या सचिव जी च्या भुमिकेमुळे अभिनेता जितेंद्र कुमारने लोकप्रियता मिळवली. त्याच्या भुमिकेला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली. जितेंद्रची या आधी गाजलेली सिरीज म्हणजे 'कोटा फॅक्ट्री'. या सिरीजमध्ये त्याने साकारलेल्या जितू भैय्या या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अशातच आता या सिरीजचा तिसरा सिझन लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'पंचायत' आणि 'कोटा फॅक्ट्री' च्या यशानंतर जितेंद्र कुमार सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सध्या या सिरीजसाठी त्याने घेतलेल्या मानधनाकडे सर्वांच लक्ष वेधलं. तरुण पिढीने या सिरीजला मोठ्या प्रमाणात पसंती दिली. जितेंद्रच्या पंचायतमधल्या सजिव जी प्रमाणेच 'कोटा फॅक्ट्री' मध्ये साकरालेला जितू भैय्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, असं सांगितलंय जातंय की,, जितेंद्रने पंचायतच्या तिसऱ्या सिझनसाठी एका एपिसोडचे  70,000 रुपये इतकं मानधन घेतलं होतं.'कोटा फॅक्ट्री' च्या या नव्या सिझनसाठी देखील त्याने एका एपिसोडचे 70,000 रुपये इतकं मानधन घेतल्याची चर्चा आहे. या सिरीजमधल्या सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाला  आणि कथानकाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली. 'कोटा फॅक्ट्री'च्या तिसऱ्या सिझनमध्ये नक्की काय पाहायला मिळणार ? तसंच जितू भैय्याची भुमिका पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या तिसऱ्या सिझनमध्ये मयूर मोरे, रेवती पिल्लई, अहसास चन्ना, रंजन राज, आलम खान आणि राजेश कुमार हे कलाकार देखील असणार आहेत. 


जितेंद्रनने याआधी 'चमनबहार', 'जादूगर' आणि 'ड्राय डे' या सिनेमातून त्याने काम केलं असलं तरी त्याला अभिनेता म्हणून ओळख ओटीटीमुळे मिळाली.अभिनेता जितेंद्र कुमारने 'Gone kesh' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या सिनेमातही जितेंद्रने काम केलं. TVF Pitchers या वेबसिरीजमध्येही जितेंद्रने त्याच्या अभिनयाची छाप सोडली. Zee5 वर याचे सगळे एपिसोड पाहता येतील. प्राईमवर  झालेल्या 'परमनंट रुममेट्स' (Permanent Roommates) या वेबसीरिजमधून जितेंद्रने ओटीटी विश्वात अभिनयाला सुरुवात केलीय.