Kota Factory Season 3 : अभिनेता जितेंद्र कुमार याची 'पंचायत 3' सिरीज नुकतीच रिलीज झाली आहे. अनेकांनी पंचायतच्या तिसऱ्या सिझनला देखील डोक्यावर घेतलंय. जितेंद्र कुमारने (Jitendra Kumar) साकारलेली सचिवजीच्या भूमिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. अशातच आता जितेंद्र कुमारच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुड न्यूज समोर आली आहे. जितेंद्र कुमारची आणखी एक वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला (kota factory season 3) येत आहे. 'पंचायत 3' ची चर्चा असतानाच जितेंद्र कुमारची नवीन सीरिज 'कोटा फॅक्टरी 3'ची रिलिज डेट (kota factory season 3 release date) जाहीर करण्यात आलीये. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळतंय. मात्र, या रिलीज डेटची माहिती तुम्हाला लगेच मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक कोडं सोडवावं लागणार आहे.


ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्सवर जितेंद्र कुमारची कोटी फॅक्ट्री सिरीजचे पहिले दोन पार्ट रिलीज करण्यात आले होते. अशातच आता नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आता कोटा फॅक्टरीच्या तिसऱ्या पार्टची घोषणा करण्यात आलीये. जितेंद्र कुमार म्हणजेच जितू भैय्याने एका व्हिडीओद्वारे याची घोषणा केली. मात्र, जितू भैय्याने तारीख थेट सांगितली नाही तर एक कोडं सोडवायला दिलंय. बघा तुम्हाला जमतंय का कोडं सोडवायला?