मुंबई : बॉलिवूडमध्ये 'राज - रिबूट' या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री क्रिती खरबंदा ही सध्या चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत आहे ते म्हणजे काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे. सोशल मीडियावर सहसा सेलिब्रिटी त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. कित्येकदा ते चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. पण, जास्तीत जास्त वेळा सेलिब्रिटी ट्रोलच होतात. यावेळी क्रितीलाही अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे.