मुंबई : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सई स्व:चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर कायमच शेअर करत असते. सईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली की, लगेच व्हायरल होतेच. सईने आता पर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. सईने अनेक मराठी सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तसंच सुभाष घई यांच्या 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' या सिनेमातून सईने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं होतं. आता लवकर सई पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपट 'मीमी'मध्ये दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच या सिनेमांचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा टीझर सईने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. सईने  ट्रेलर शेअर करताच हा टीझर तुफान व्हायरल होत आहे. तसंच यातील सईच्या एक्टिंगची सर्व स्तरावरुन कौतुकही केलं जात आहे. याआधी सईने या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. 



'मीमी' हा चित्रपट 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटाच्या  ट्रेलरमध्ये बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन गर्भवती असल्याचं दिसत आहे. या चित्रपटाला २०११ मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करणार आहेत. दरम्यान, सई 'समांतर २' या सीरिजमध्ये दिसली होती.


'मीमी' चित्रपटात एका सरोगेट स्त्रीच्या भूमिकेत क्रिती दिसणार आहे. या स्त्रीला अभिनेत्री व्हायचं असतं आणि या दरम्यान ती एका जोडप्याला भेटते आणि ती सरोगेट आई होण्याचा निर्णय घेते. त्यानंतर अभिनेत्री होण्याच्या स्वप्नापासून एक सरोगेट आई होई पर्यंत तिच्या आयुष्यात काय बदल होतात हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सई या सिनेमांत एका मुख्य भूमिकेत आहे त्यामुळे तिचे चाहते तिचा हा सिनेमा पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक असल्याचं पहायला मिळत आहेत


सईने अमिर खानसोबत काम केलं आहे. ती अमिरच्या गजनी सिनेमांत दिसली होती. याशिवाय तिने हंटर आणि वेक अप इंडिया सिनेमांत देखील काम केलं आहे. हंटर या सिनेमांतून सई प्रसिद्धी झोकात आली. या सिनेमातील सईने साकरलेल्या जोत्सना या कॅरेक्टरने खूप पसंती मिळवली. सईचा आगामी 'मीमी' हा सिनेमा 30 जुलैला नेटफ्लिक्सवर आपल्यासा पहायला मिळेल.