Kirti Sanon : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन तिच्या अभिनयाच्या करिअरसोबतच तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की क्रिती सेनन ही दाक्षिणात्य अभिनेता प्रभाससोबत रिलेशनशिपमध्ये आहे. खरंतर, त्या दोघांपैकी कोणीही रिलेशनशिपमध्ये असलेल्या चर्चांवर वक्तव्य केलं नाही. सध्या क्रितीचा एका मिस्ट्री मॅनसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोला पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आणि तिच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्ती केली की क्रिती या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असायला हवी. तर असं म्हटलं जातं ही व्यक्ती यूकेत असून एक बिझनेसमॅन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता रेडिटवर एक पोस्ट सध्या फार व्हायरल होतेय. यात क्रिती सेनन ही रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं आहे. ज्या व्यक्तीविषयी चर्चा आहे तो क्रितीचा रुमर्ड म्हणजेच कथित बॉयफ्रेंड आहे. तर त्याचं नाव कबीर बहिया आहे. त्याचं महेंद्र सिंह धोनीशी खास नातं आहे. ते म्हणजे त्याची पत्नी साक्षी धोनी ही कबीर बहियाची नातेवाईक असल्याचं म्हटलं जातं. कबीर बहिया ब्रिटनमध्ये राहतो आणि त्याचे वडील इंग्लंडमध्ये एक यशस्वी बिझनेसमॅन आहेत. त्यानं महेंद्र सिंह धोनी आणि साक्षी धोनीसह अनेक फोटो शेअर केले. तर लंडनमध्ये क्रिती एका व्यक्तीचा हात धरुन चालताना दिसली असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत त्या महिलेचा चेहरा दिसत नाही आहे फक्त तिची पाठ दिसते. मात्र, काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की त्या महिलेच्या आजुबाजूला जे लोक दिसत आहेत. ते क्रितीच्या टीममधील आहेत. तर इतकंच नाही तर क्रिती सेननची टीम ही कबीर बहियाला फॉलो करते आणि त्याच्या सगळ्या पोस्टला लाइक करते. 


Saw Kriti Sanon in London holding hands with a guy.
byu/Dripkumar inBollyBlindsNGossip

लक्षवेधी गोष्ट म्हणजे कबीर बहिया हा क्रिती पेक्षा वयानं दहा वर्ष लहाण आहे. बॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय या अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्याहून वयानं लहाण असलेल्या पुरुषाशी लग्न केलं. त्याशिवाय गौहर खान, नेहा कक्कड हे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी त्यांच्याहून वयानं लहाण असलेल्या पुरुषाशी लग्न केलं. 


हेही वाचा : 'विवाहित महिलेसोबत रिलेशनशिप, पतीनं पकडताच...'; इमरान हाश्मीनं केला खुलासा


या वर्षाच्या सुरुवातीला क्रिती सेननची बहीण आणि अभिनेत्री नुपुर सेननला दुबईत सिंगर स्टेबिन बेनसोबत स्पॉट करण्यात आलं होतं. असं म्हटलं जातं की ते दोघं 2022 च्या शेवटी एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आले होते.