Nupur Sanon: सध्या चर्चा आहे ती म्हणजे क्रिती सनन या अभिनेत्रीची. नुकताच तिला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे तिच्याबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी लिहून येत आहेत. सोशल मीडियावरही तिनं आपला हा आनंदोत्सव आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता. आता आपल्याला मिळालेल्या याच राष्ट्रीय पुरस्काराची संधी साधून क्रिती सनन या अभिनेत्रीनं आपल्याच लाडक्या सख्ख्या बहिणीला बड्या साऊथ इंडियन चित्रपटातून लॉन्च करण्याचा वशिला लावला आहे. याचे पोस्टर तिनं काही तासांपुर्वीच सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपोटिझम हा शब्द बॉलिवूडच्या अंगवळणी पडलाय जणू. त्यामुळे कुठल्याही बड्या हिरोईननं आणि हिरोनं आपल्या परिवारातील कोणत्याही सदस्याला बॉलिवूडमध्ये लॉन्च केले तर नेटकऱ्यांच्या आणि चाहत्यांच्या नजरा लगेचच त्यांच्याकडे वळू लागतात. लगेचच हे नेपोटिझम आहे, नेपोटिझम आहे, याचा नारा सुरू करतात. यावेळी असंच काहीसं झालं आहे. 


नेटकऱ्यांनी तिच्या या पोस्टरवर नाना तऱ्हेच्या कमेंट्स करू लागल्या आहेत. यावेळी तिनं लिहिलं आहे की, ''मला फार आनंद होतोय की मी माझ्या बहिणीला लॉन्च करते आहे. त्यापेक्षा दुसरा कोणताच आनंद नाही आहे.'' यावेळी नुपूर सननचा 'टायगर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पॅन इंडिया प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नुपूर सननची यावेळी चांगलीच चर्चा रंगलेली आहे. परंतु यावेळी मात्र नेटकऱ्यांचा त्रागा आणि जळफळाट बाहेर आल्याचे दिसून येते आहे. तर काहींना माहिती आहे की हे नेपोटिझम आहे तरी अनेकांनी तिच्या बहिणीला शुभेच्छा दिल्याचे दिसून येते आहे. काहींनी हे नेपोटिझन आहे. असं म्हटलं आहे तर काहींनी यावेळीही हे नेपोटिझम आहे असंच म्हटलं आहे. 


हेही वाचा : पतीचा अपघाती मृत्यू, 20 वर्षांनी मोठ्या गायकावर प्रेम, लग्नाआधीच प्रेग्नंट; 'या' अभिनेत्रीचे वादग्रस्त आयुष्य कायम चर्चेत



अभिनेत्री क्रिती सनन ही गेली 9 वर्षे बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळीही तिची जोरात चर्चा रंगलेली आहे. मिमी या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यावेळी तिला फार मोठ्या प्रमाणात चांगलाच प्रतिसादही मिळाला आहे. तिची बहिणही या क्षेत्रात सक्रिय आहे. तिनं याआधी अक्षय कुमारसोबत काम केले आहे. आता तिचा लीड असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती सारा या भुमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.