मुंबई : क्रिती सॅनन सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या सुवर्ण कारकिर्दीच्या शिखरावर आहे. अनेक चित्रपट असूनही, अभिनेत्रीला कोणतंही दडपण वाटत नाही आणि त्याऐवजी प्रेरणा मिळते. क्रितीचा 'मिमी' सिनेमा रिलीज आहे. तिच्या डायरी भरल्या आहेत कारण तिच्या लिस्टमध्ये 'हम दो हमारे दो', 'बच्चन पांडे', 'भेडिया' आणि 'आदिपुरुष' समाविष्ट आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर आलं, नाही, कोणताही दबाव नाही.
फोर्ब्स इंडियाच्या टॉप 100च्या सेलिब्रिटी 2019 च्या यादीत दिसणारी क्रिती म्हणाली, "मला उत्साह, प्रेरणा आणि रोमांच वाटते कारण मला तेच करायचं होतं. हिच ती जागा आहे जिथे मला पोहचायचं होतं. आणि जेव्हा मी ईथे  पोहचली आहे. तेव्हा माझ्यासमोर एक प्रकारची संधी आहे. " क्रिती तिच्या वाट्याला येणाऱ्या कामामुळे आनंदी आहे. तिचे चाहतेही तिला खूप पाठिंबा देत आहेत.


क्रिती सॅननने सांगितली मोठी गोष्ट 
ती म्हणाली की "मी असे सिनेमा करत आहे. जे कोणत्याही प्रकारात किंवा टेस्टमध्ये अजिबात एकसारखे नाहीयेत. मला विविध पात्र साकारायला मिळत आहेत. अशा अप्रतिम दिग्दर्शकांसोबत आणि मला आवडणाऱ्या स्टोरींसोबत मी काम करायला मला मिळत आहेत. ज्याचा मला हिस्सा बनायचा आहे. "


क्रिती पुढे म्हणाली, "प्रेम आणि मान्याता एकदा बरसायला सुरू झाले की, तुम्हाला अधिक समाधान आणि प्रेरणा मिळते. मी रोमांचित आहे आणि या सुंदर टप्प्याचा आनंद घेत आहे आणि मी माझ्या प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे."