मुंबई : सोमवारी रात्री बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन गायक स्टेबिन बेनसोबत डिनर डेटवर जाताना दिसली. विशेष म्हणजे यावेळी दोघंही एकटे नव्हते, तर क्रितीचे आई-वडीलही यावेळी तिच्यासोबत दिसले. त्यामुळे आता वेगवेगळे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. काहीजण क्रिती आणि स्टेबिनचं नावं एकत्र जोडत आहेत. तर काहीजण त्यांच्या नात्याची लवकरच पुष्टी होणार असल्याचं सांगत आहेत. पण खरं प्रकरण काहीतरी वेगळच आहे. जे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेबिन नूपूरला डेट करत आहे, क्रितीला नाही
खरं तर स्टेबिन बेन अभिनेत्री क्रिती सेननला नाही तर तिची बहीण नुपूर सेननला डेट करत आहे. त्यांच्या डेटींगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत होत्या आणि आता कदाचित दोघांनाही आपलं नातं पुढे न्यायचं आहे. त्यामुळे सोमवारी क्रिती आई-वडिलांना घेवून  स्टेबिनला भेटण्यासाठी डिनरसाठी पोहोचली.


मात्र, यावेळी नुपूर सेनॉन दिसली नाही. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. स्टेबिनने नुपूरसोबतच्या नात्याचा इन्कार केला असला तरी, हा व्हिडिओ आल्यानंतर हे नातं पक्कं झाल्याचं मानलं जात आहे.


कोण आहे स्टेबिन बेन
स्टेबिन हा एक प्रसिद्ध गायक असला तरी, तुम्हाला माहीत नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, भोपाळमध्ये राहणाऱ्या स्टेबिनने म्युझिक व्हिडिओंसोबतच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपला आवाज दिला आहे. हॉटेल मुंबई, कैसी ये यारियां, शिमला मिर्ची यांसारख्या चित्रपटांमध्ये आवाज देणारा स्टेबिन हा एक कलाकार आहे. ज्याचे स्टेज शो खूप हिट होतात.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


2017 मध्ये त्याने पार्श्वगायका म्हणून पदार्पण केलं. दुसरीकडे, क्रिती सेननबद्दल बोलायचं झालं तर ती पुन्हा एकदा कार्तिक आर्यनसोबत शहजादामध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहे. याआधी दोघंही लुका छुपीमध्ये एकत्र दिसले होते आणि दोघांची जोडीही चांगलीच पसंतीस उतरली होती.