मुंबई : अभिनेत्री क्रिती सेनन ही इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. क्रिती तिच्या स्पष्ट मत आणि भन्नाट अभिनयासाठी ओळखली जाते. यासोबतच क्रिती तिच्या सिनेमांसंबंधित अपडेट्सही सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. क्रिती नुकताचं टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती, ज्यामध्ये तिने लिव्ह-इन रिलेशनशिप आणि सरोगसीवर मोकळेपणाने मत मांडलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी क्रितीला सेननला विचारण्यात आलं, क्रिती सेनन कधी समाजाच्या कचाट्यातून बाहेर पडून लिव्ह-इन रिलेशनशिप आणि सेरेगोसीचा निर्णय घेऊ शकते का? यावर प्रतिक्रिया देताना क्रितीने स्वतःचं मत मांडलं आहे. क्रितीचं वक्तव्य सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 


क्रिती म्हणते, 'यामध्ये काहीही चुकीचे नाही... माझे आई-वडील मला परवानगी देतील असं मला वाटत नाही. पण माझी आई खूप मस्त आहे... आई माझ्या या निर्णयाचं स्वगत करेल. पण नंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा ती मला याची काय गरज आहे? हे नक्कीच विचारू शकते.... 



'मीमी' सिनेमाचं उदाहरण देत, सरोगसीबद्दल बोलताना ती म्हणाली, 'सरोगसीमध्ये काहीही चुकीचे नाही, सिनेमा सरोगसी कायद्यापूर्वी बनवलेला आहे. अशा घटनांनंतरच सरोगसी कायद्याची गरज निर्माण झाली... क्रितीने 'मीमी' सिनेमाच्या माध्यमातून अनेकांची मने जिंकली.


क्रिती पुढे म्हणाली, 'जर तुम्हाला काही काळानंतर मूल होऊ शकत नसेल आणि तुमच्या कुटुंबात, जीवनात आनंद हवा असेल तर सरोगसीचा निर्णय घेण्यात गैर काहीच नाही... असं देखील क्रिती म्हणाली...