मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी अभिनेत्री कृतिका कामरा लवकरच मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोट्या पडद्यावर तब्बल १२ वर्ष काम केल्यानंतर आता कृतिका 'पेली चुपुलु' या तेलुगु सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. तेलुगु सिनेमात विजय देवराकोंडा आणि रितू वर्मा दिसले होते. या सिनेमानं राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता. 


हिंदी रिमेकमध्ये कृतिकासोबत जॅकी भगनानीही दिसणार आहे. याला 'फॅन्टम फिल्म्स' प्रोड्युस करणार आहे. या सिनेमाचं कथानक 'अरेन्ज मॅरेज'वर आधारीत आहे. 


'फिल्मिस्तान'चे दिग्दर्शक नितिन कक्कड या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. कृतिका आणि जॅकीशिवाय या सिनेमात प्रतिक बब्बर आणि गुजराती अभिनेता प्रतिक गांधी यांच्याही भूमिका असतील. या सिनेमाचं शूटिंग अहमदाबादमध्ये होईल. 


यापूर्वी कृतिका कितनी मोहब्बत है, कितनी मोहब्बत है २, कुछ तो लोग कहेंगे, चंद्रकांता या मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आली होती.