केकेआरचे अकाऊंट ट्विटरने केले संस्पेंड, आमिरवर काढला राग
आमिरच्या सांगण्यावरुन त्याचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्याचे केकेआर सांगत आहे.
नवी दिल्ली : २००८ मध्ये 'देशद्रोही' या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या आणि नेहमी वादग्रस्त विधान करणाऱ्या कमाल खान उर्फ केकेआरचे ट्वीटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरवर केआरकेला फॉलो करणाऱ्यांची संख्या ६० लाख इतकी होती. त्यामूळे केकेआरला तोंड उघडून वादग्रस्त विधान करायला अजून एक कारण सापडल आहे. पण यावेळेस त्याने आमिर खानला जबाबदार धरले.
गुरुवारी आमिर खान प्रोडक्शनची सिक्रेट सुपरस्टार फिल्म सिनेमा घरात प्रदर्शित होत आहे. एका बाजुला फिल्म समीक्षक या फिल्मची तारीफ करत आहेत तर दुसरीकडे केकेआरने याला वाईट म्हटले आहे. तो म्हणतो आमिरच्या सांगण्यावरून माझे ट्वीटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. यासाठी कोणतीही वॉर्निंग आली नसताना ट्वीटर अकाऊंट कसे बंद करु शकतो असा प्रश्न केकेआर विचारत आहे.
आपल्या फेसबुक पेजच्या पोस्टद्वारे अनेक प्रश्न उपस्थित करून केकेआरने आपला राग व्यक्त केला आहे.
ट्विटर अकाऊंसाठी खूप मेहनतीने ६० लाख फॉलोअर्स जमल्याचे केकेआर सांगतो. पण आमिरच्या सांगण्यावरुन त्याचे ट्विटर अकाऊंट बंद झाल्याचे तो सांगत आहे.
'मी चित्रपटाबद्दल बोलणे थांबविणार नाही. माझ्याजवळ स्वतः ची वेबसाइट आणि YouTube चॅनेल आहे, चित्रपटाविषयी लिहिणे सुरूच ठेवेन असे' केआरकेने म्हणतो. केकेआर जरी असे म्हणत असला तरी यामागचे सत्य समोर आले नाही. तरीही विक्रम भट्ट यांच्याव्यतिरिक्त अनेकांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
केकेआर हा स्वत: ला सर्वश्रेष्ठ चित्रपट समीक्षक समजतो आणि कोणत्याही चित्रपटाच्या रिलीजआधी त्याची समीक्षा करत असतो.