सलमानच्या मेहुण्याला डेट करते क्रिती
`हाऊसफुल ४` चित्रपटामुळे क्रिती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये कोणाचं सूत कधी कोणासोबत जुडेल हे सांगता येत नाही. सध्या अभिनेत्री क्रिती खरबंदा अभिनेता पुलकित सम्राटला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही काळात सुरु होत्या. परंतु खुद्द क्रितीने त्यांच्या नात्याला दुजोरा दिला आहे. पुलकित, सलमान खानची मानलेली बहिण श्वेता रोहिराचा पती आहे. परंतु एका वर्षातच ते एकमेकांपासून विभक्त झाले.
एका मुलाखतीत क्रितीने आपण पुलकितला डेट करत असल्याची माहिती दिली. 'हाऊसफुल ४' चित्रपटामुळे क्रिती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे. त्याचप्रमाणे ती 'पागपंती' चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ते दोघे पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.
'वीरे की वेडींग' चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाचं एकत्र काम केलं होते. या चित्रपटादरम्यान दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि कालांतराने या प्रेमात रूपांतर प्रेमात झाले. ते लंडनमध्ये एकाच रेसीडेंशल कॉम्प्लेक्समध्ये राहात होते.
२०१४ रोजी श्वेता रोहिरा आणि पुलकित सम्राट यांनी लग्न केले होते. परंतु त्यांचे लग्न अयशस्वी ठरले. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. वर्षभरातच दोघांनी एकमेकांना घटस्फोट दिला.