मुंबई : शुटिंगवरून घरी परतत असताना अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. खुद्द अभिनेत्रीने घडला प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितला आहे. सध्या  अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभनित्री कृतिका देसाईने सोशल मीडियावर पोस्टसह एक व्हिडिओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये कृतिका तिच्या कारमध्ये बसलेली आहे. कृतिकाच्या ड्रायव्हरसोबत तीन जण वाद घालत आहेत. अभिनेत्रीने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं आहे.


अभिनेत्री म्हणते
'शूटिंग संपवून मी घरी परतत होती. वाटेत तिघांनी माझी गाडी थांबवली. हे तिघे दुचाकीवरून आले होते. माझ्या ड्रायव्हरला थांबायला सांगितले. माझ्या गाडीत ड्रग्जची झडती घेणार असल्याचे तिघांनी सांगितले. या लोकांनी मला त्यांचा फेक आयडी देखील दाखवला. त्यानंतर हे लोक गैरवर्तन करू लागले.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे अभिनेत्री म्हणाली, 'यानंतर मी त्याला म्हणालो की लेडी कॉन्स्टेबल कुठे आहे, तिला बोलवा. तेव्हा मी त्या लोकांचा व्हिडिओ बनवला. फिल्मसिटी ते गोकुळधाम दरम्यान ही घटना घडली. हे लोक अशाच प्रकारे लोकांना घाबरवतात.'


एवढंच नाही तर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करणार असल्याची ताकीद अभिनेत्रीने त्या अज्ञात व्यक्तींना दिली. शिवाय कृतिकाने इतर लोकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. सध्या कृतिकाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.