मुंबई : सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते. यावेळीही असंच काहीसं घडलं आहे. असे वृत्त आहे की, अभिनेत्रीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एंट्री  झाली आहे आणि तिचं हे नवीन प्रेम दुसरं तिसरं कोणी नसून गुलाम गौस दीवानी आहे अभिनेत्री सध्या  गुलाम गौस दिवानीला डेट करत आहे. जो रेस्टॉरंट व्यवसायात माहिर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका रिपोर्टनुसार, क्रिस्टल आणि गुलाम गेल्या 6 महिन्यांपासून एकत्र आहेत. दोघांचे अनेक फोटो समोर आले आहेत.  ज्यामध्ये दोघं एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. हे फोटो गुलाम गौस यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. नुकताच, क्रिस्टल डिसूझानेही गुलाम गॉससोबत मस्ती करतानाचे एक व्हिडिओ आणि फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहेत. हे फोटो-व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगचा अंदाज लावला जात आहे.


क्रिस्टल डिसूझा आणि गुलाम गौस यांचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. गुलाम गौसने 6 दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओ पोस्टमध्ये ती त्याच्यासोबत तिची सुट्टी कशी घालवत आहे. हे तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ पोस्ट करत गुलाम घौसने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, प्रेम, मैत्री, आठवणी. गुलामने हा व्हिडिओ क्रिस्टल डिसूझा समेत टीव्ही कलाकार रित्विक धनजानी आणि प्रियांका तालुकदार यांना टॅग केलं आहे.


व्हिडिओमध्ये रित्विक धनजानी आणि प्रियांका तालुकदारही दिसत आहेत. याआधी अभिनेत्रीचं अनेक दिवसांपासून अभिनेता करण टेकरसोबत अफेअर होतं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


करणसोबत ब्रेकअप झाल्यानंतर या अभिनेत्रीचं नाव फ्रेडी दारूवालासोबतही जोडलं गेलं. क्रिस्टल डिसूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या सौंदर्याच्या जोरावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. क्रिस्टल दररोज तिचे एकापेक्षा-एक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.