मुंबई : सध्या सगळीकडे लग्नाचा हंगाम सुरु आहे. अशा परिस्थितीत टीव्ही आणि बॉलिवूड स्टार्सची देखील एका पाठोपाठ लग्न करत आहेत. येत्या आठवड्यात अनेक स्टार्स सात फेरे घेण्याची तयारी करत आहेत. यापैकी अनेक स्टार्स बऱ्याच दिवसांपासून लग्न करण्याचा विचार करत होते. कोरोनामुळे या स्टार्सची प्लॅनिंग बिघडली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच हे स्टार्स लग्न करण्याच्या तयारीत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा 
टीव्हीचं प्रसिद्ध कपल पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांचं आज म्हणजेच १५ नोव्हेंबर रोजी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग पार पडलं आहे. त्याच दिवशी पूजा बॅनर्जी आणि कुणाल वर्मा यांनी त्यांचा मेहंदी आणि संगीत सोहळा आयोजित केला होता.



राजकुमार राव आणि पत्रलेखा
या यादीतलं पुढचं नाव म्हणजे राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचं आहे. नुकतंच राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची एंगेजमेंट झाली होती. राजकुमार राव आणि पत्रलेखा आज एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली आहेत. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. या दोघांच्या लग्नाचे फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



श्रद्धा आर्य
कुंडली भाग्य स्टार श्रद्धा आर्या हिच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. श्रद्धा आर्य उद्या म्हणजेच 16 नोव्हेंबरला लग्न करणार आहे. काही काळापूर्वी श्रद्धा आर्याने तिच्या पतीचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता.



विकी कौशल- कतरिना कैफ
बॉलिवूडचे प्रसिद्ध लव्ह बर्ड्स विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नाच्या बेडीत लवकरच अडकणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचं लग्न 7 ते 9 डिसेंबर पार पडणार आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.



अंकिता लोखंडे
पवित्र रिश्ता स्टारर अंकिता लोखंडे डिसेंबर 2021 मध्ये लग्न करणार आहे. 12, 13, 14 डिसेंबरला अंकिता लोखंडे आणि विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतीच अंकिता लोखंडे तिच्या लग्नासाठी शॉपिंग करताना दिसली होती.