जगप्रसिद्ध Times Square वर पत्नीने असं काही केलं की Kushal Badrike म्हणाला, `याला म्हणतात यश`
Kushal Badrike Post For Wife Sunayna : कुशल बद्रिकेनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याच्या पत्नीला मिळालेल्या यशावर अभिमान असल्याचं म्हटलं आहे. त्यानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तर सुनयना थेट तिनं टाइम्स स्व्केअर केलेल्या कामगिरीमुळे चर्चेत आली आहे.
Kushal Badrike Post For Wife Sunayna : छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असलेला कॉमेडी कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. फक्त मराठी नाही तर बॉलिवूड कलाकार देखील त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येथे पोहोचतात. या कार्यक्रमातील कलाकारांनी त्यांच्या अभिनयानं सगळ्यांचे मने जिंकली आहेत. त्यांच्यापैकी एक म्हणजे सगळ्यांचा लाडका अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिके. कुशल ज्या प्रमाणे एक कलाकार आहे त्याच प्रमाणे त्याची पत्नी सुनयना देखील एक कलाकार असून ती एक उत्तम कथ्थक डान्सर आहे. आता सुनयनानं असं काही केलं आहे ज्यानं कुशलला खूप आनंद झाला असून तिचा अभिमान वाटत असल्याचे सांगत त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. कुशलनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
कुशलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओत कुशलची पत्नी सुनयना ही अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरवर सुरु असलेल्या फ्लॅश मॉबमध्ये होती. हा फ्लॅश मॉब मुघल-ए-आझमसाठी होता. सुनयना ही सध्या ‘मुघल-ए-आझम’ या रंगभूमीवरील महानाट्यात काम करताना दिसत आहे. त्याच निमित्तानं या नाटकाची संपूर्ण टीम ही अमेरिका दौऱ्यासाठी गेली आहे. त्यात सुनयना एक होती. हा व्हिडीओ शेअर करत कुशलनं “मोठी कामगिरी, मोठी कामगिरी म्हणतात ना ती हीच… अभिनंदन मुघल-ए-आझमची टीम”, असे कॅप्शन दिले आहे. ‘मुघल-ए-आझम’ या नाटकाचे दिग्दर्शन फिरोज अब्बास यांनी केले आहे. तर अभिनेत्री प्रियंका बर्वे ही अनारकलीच्या भूमिकेत आहे.
हेही वाचा : झायरा वसीम आणि सना खाननंतर 'या' लोकप्रिय अभिनेत्रीनं कलाविश्वाला केला रामराम! PHOTO VIRAL
पुढे सुनयना म्हणाली, "बाकी तू परत येशील तेंव्हा… हा ऋतू बदलला असेल, पाऊस, 'कुणीतरी पाणी शिंपडावा' एवढाच उरला असेल, शाळेत मुलांचे वर्ग आणि मित्र बदललेले असतील, 'मनुची' हाफ पँट जाऊन फुल पँट आली असेल, 'गंधूची' परीक्षा जवळ आल्यामुळे अख्ख घर अंडरप्रेशर असेल. काय गंमत आहे बघ, कधी काळी, 'आपलं सुद्धा एक घर असेल', अशी स्वप्नं पापण्यांत घेऊन, आपण घराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसायचो, आता 'तुझ्या' वाटेकडे 'आपलं घर' डोळे लाऊन बसेल… आणि मी……….. मी, छोट्टीशी खोली होऊन जाईन त्या घरातली, नुसत्या भिंतींची…. तुझ्या वाचून रिकामी………. (सुकून) तळ टिप:- तुला संधी देणाऱ्यांचे मनापासून आभार आणि मुघलांनी अमेरिकेवर कधीच राज्य केलं नाही, पण “मुघल ए आजम” ह्या तुमच्या कार्यक्रमाने अख्खी अमेरिका जिंकावी ह्या सगळ्यांना शुभेच्छा."