मुंबई : तामिळ सुपरस्टार विजयचा नवा चित्रपट 'बीस्ट' रिलीजसाठी सज्ज आहे. चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्याआधीच चाहत्यांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्साह आहे. दरम्यान, कुवेतने या चित्रपटावर बंदी घातली आहे. याचाच अर्थ तेथील लोकं 'बीस्ट'चा आनंद घेऊ शकणार नाहीत. हा चित्रपट नेल्सन दिलीप कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे आणि हा एक  होस्टेज ड्रामा आहे. ज्यात विजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी हे सिनेमा देखील बॅन
या चित्रपटात कथितरित्या मुस्लिम पात्रांना आतंकवादी म्हणून दाखवण्यात आलं आहे. ज्याला कुवेत सरकारने विरोध केला आहे आणि त्यामुळे तेथे 'बीस्ट'वर बंदी घालण्यात आली आहे. याआधी  Dulquer,'कुरूप', 'FIR' वरही अशीच बंदी घालण्यात आली होती.


अशा सिनेमांना नाही मिळत परमिशन
'कुरूप' चित्रपटात एक ठग कुवेतमध्ये आश्रय घेत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. तर 'एफआयआर'मध्ये मुस्लिम दहशतवादाशी संबंधित एक कथा होती. खरं तर अरब देशांना दहशतवाद्यांचे आश्रयस्थान म्हणून दाखवणारे चित्रपट कुवेतमध्ये प्रदर्शित होऊ दिले जात नाहीत. दक्षिण भारतातील अनेक लोकं कुवेतमध्ये राहतात आणि ते 13 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.


UAE चे दर्शक घेवू शकतात आनंद
कुवेत सरकारने या सिनेमाला देशाच्या हिताच्या विरोधात असणारा सिनेमा म्हटलं आहे. विशेष म्हणजे कुवेतने या चित्रपटावर बंदी घातली असली तरी त्याला संयुक्त अरब अमीरात (UAE) आणि इतर अरब देशांमध्ये मान्यता मिळाली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचा विचार केला तर तो प्रचंड गाजला आहे. आत्तापर्यंत लाखो लोकांनी ते पाहिलं आहे. विजयचे मिडल इस्टमध्ये जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी घातल्याने भारताबाहेरील सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होईल.