`या` अभिनेत्रीचं एक ट्विट आणि कंपनीच कोट्यावधीचं नुकसान
रियॅलिटी टीव्ही स्टार कायली जेनरचे फॅन्स जगभरात आहेत. पण कायली सध्या आपल्या ट्वीटमुळे चर्चेत आलीय.
नवी दिल्ली : रियॅलिटी टीव्ही स्टार कायली जेनरचे फॅन्स जगभरात आहेत. पण कायली सध्या आपल्या ट्वीटमुळे चर्चेत आलीय.
तिचे एक ट्विट मल्टीमीडिया अॅप कंपनी स्नॅपचॅटला चांगलेच महागात पडले. त्यामुळे एका दिवसात स्नॅपचॅटला अरबोंचे नुकसान झेलावे लागले.
एका ट्विटमुळे स्नॅपचॅटला १.३ कोटींचा झटका लागलाय.
शेअर्स घसरले
स्रॅपचॅटची पॅरेंट कंपनी स्नॅप इंकचे शेअर ६.१ टक्क्यांनी घसरले. कंपनीचे मार्केट व्हॅल्यूच्या हिशोबाने १.३ अरब डॉलरचा झटका बसलाय.
'स्नॅपचॅट वापरण बंद केलं ?'
मल्टीमीडिया अॅप कंपनी स्नॅपचॅटने आपल्या फिचर्समध्ये काही बदल केले. स्नॅपचॅटच्या या बदलासंबंधी कायली हिने एक ट्विट केले. 'माझ्या व्यतिरिक्त कोणी अजून स्नॅपचॅट उघडण बंद केलयं ? का फक्त मीच केलयं? ओहह हे खुप दु:खद आहे.'
हजारोंनी केल रिट्विट
तिच्या या ट्विटला हजारो फॉलोअर्सनी रिट्वीट करायला सुरूवात केली. साधारण २ लाख ९० हजारापेक्षा अधिकांनी ते ट्विट लाईकही केलं.