मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील 'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही मालिका आजही प्रेक्षकांच्या हृदयात आहे. शोच्या सर्व पात्रांपासून ते कथेपर्यंत प्रत्येक गोष्टींनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता 'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही मालिका पुन्हा एकदा स्टार प्लसवर सुरू होणार आहे. या जुन्या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या आठवणी ताज्या होणार असल्या तरी या शोशी जोडलेले अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी आता या जगाचा निरोप घेतला आहे. त्यात अभिनेता इंदर कुमार यांच्यापासून अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचाही समावेश आहे.



सलमान खानच्या 'वॉन्टेड' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या इंदर कुमारने 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण 2017 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचा मृत्यू झाला.



 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधून बा म्हणून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री सुधा शिवपुरी यांनीही या जगाचा निरोप घेतला आहे. 2015 मध्ये ऑर्गन फेलियरमुळे त्यांचा मृत्यू झाला.



अबीर गोस्वामीने 'क्योंकी सास भी कभी बहू थी' तसेच 'सीआयडी', 'कुसुम', 'कभी सौतन कभी सहेली' सारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले. 2013 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने या अभिनेत्याचे निधन झाले.



 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील अभिनेता समीर शर्माने 4 ऑगस्ट 2020 रोजी या जगाचा निरोप घेतला. मालाड येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये तो मृतवस्थेत आढळला. या मालिकेशिवाय त्याने 'कहानी घर घर की', 'ज्योती' आणि 'वो रहे वाली महल की'मध्येही काम केले.