मुंबई : अगदी सगळीकडेच लगीन सराई पाहायला मिळत आहे. 2018 हे वर्ष प्रत्येकासाठी खास आहे. मग ते बॉलिवूडकरांकरता असो किंवा सामान्यांकरता... 2018 हे वर्ष सरत्यावेळी प्रत्येकाला काही ना काही खास देत आहे. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत खूप कलाकार लग्नबंधनात अडकले. या अगदी सरत्या 15 दिवसांत आणखी काही कलाकार आपल्या जोडीदाराची घोषणा करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या जोडीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ती जोडी म्हणजे अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री भाग्यश्री नवले. या दोघांच्या नावाची आणि फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. 


'लागिरं झालं जी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला शितली आणि अज्याचा मित्र विक्की.. अभिनेता निखिल चव्हाणने विक्कीची भूमिका साकारली होती. अगदी अल्पावधीतच निखिलने साऱ्यांची मनं जिंकली. 


निखिलने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील कॅप्शनकडे सगळ्यांच लक्ष आहे. Something... Something... Something असं लिहिलं असून हार्टही शेअर केले आहे. 



या दोघांनी अनेकदा एकत्र पाहिलं आहे. नुकतंच यांना विरारच्या फार्म हाऊसवर पाहण्यात आलं. तसेच निखिल भाग्यश्रीला सध्या खूष ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.


तसेच ही जोडी रिअल लाईफ लव्हबर्डस 'शुद्धदेसी मराठी'च्या 'स्त्रीलिंग पुलिंग' या नव्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला देखील येत आहेत.