मुंबई : आमिर खानच्या बहुप्रतिक्षित सिनेमा 'लालसिंग चड्ढा'चं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम लडाखमध्ये सतत शूटिंगमध्ये व्यस्त होती. तिथले फोटो देखील सोशल मीडियावर येत होते. पण जेव्हापासून ही टीम शूटवरुन परतली तेव्हापासून सोशल मीडियावर या टीमवर गंभीर आरोप केले जात आहेत. लडाखमध्ये 'लालसिंग चड्ढा'च्या शूटिंगदरम्यान कचरा टाकल्यामुळे या संपूर्ण टीमला टीकेला सामोरं जावं लागत आहे. चर्चेत आल्यानंतर आता आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसने एक अधिकृत निवेदनाद्वारे हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे निवेदन जारी करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिरच्या टीमनं दिलं हे स्पष्टीकरण
आमिरचं प्रॉडक्शन हाऊसच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन दिलेल्या निवेदनात या चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे की, कलाकार आणि त्याच्या कर्मचाऱ्यांवरील कोणतेही आरोप खरे नाही आहेत आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याबाबत ते अत्यंत काळजी घेत आहेत. या निवेदनात असंही म्हटलं आहे की, ''कोणालाही ही बाब चिंताजनक वाटू शकते, आम्ही कंपनी म्हणून आमच्या शूटिंगच्या ठिकाणी आणि आसपास स्वच्छतेसाठी कठोर प्रोटोकॉल आम्ही पाळतो.'' असं संपूर्ण स्पष्टीकरण आमिरच्या टीमने दिलंय.



हे आरोप खोटे आहेत
अमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ''आमचा विश्वास आहे की, आमची जागा स्वच्छ न ठेवण्याबाबत काही अफवा किंवा आरोप आमच्यावर केले जात आहेत. आम्ही अशा दाव्यांना फेटाळून लावतो. आमचं शूटींग लोकेशन संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांना पाहिजे तेव्हा या संबधित चौकशी करु शकतात.


काय आहे नेमकं प्रकरण 
जिग्मत लद्दाखी नावाच्या सोशल मीडिया युजरने यापूर्वी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये, संपूर्ण टिमने वापरलेल्या शूटिंग लोकेशन ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा फेकलेला दिसत आहे. 'उपहार' खानच्या 'लालसिंग चड्ढा'वर त्यांनी टीका केली. जे लोकं लडाखमधील वाखाच्या गावकऱ्यांसोबत शूटिंग' करत होते. त्यांनी हे पण सांगितलं की, अभिनेता आपल्या सामाजिक जागरूकता कार्यक्रम 'सत्यमेव जयते'मध्ये पर्यावरणीय स्वच्छतेचा प्रस्ताव देतात.


वापरकर्त्याने लिहिलंय की, 'बॉलिवूड स्टार आमिर खानचा आगामी चित्रपट 'लालसिंग चढ्ढा' लडाखमधील वाखाच्या ग्रामस्थांना गिफ्ट आहे. आमिर खान स्वत: सत्यमेव जयतेमधील परिसर स्वच्छ करण्याबद्दल बराच बोलतो पण हे जेव्हा स्वतःकडे येतं तेव्हा असं होतं.


कसा आहे चित्रपट
आमिर आणि करीना कपूर खान पुन्हा 'लाल सिंह चड्ढा' मध्ये एकत्र दिसणार आहेत. अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लालसिंग चड्ढा' हा रॉबर्ट झेमेकीसच्या ऑस्करविजेत्या 1994 मधील 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. ज्यामध्ये हॉलिवूड स्टार टॉम हँक्सने मुख्य भूमिका साकारली होती.