मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि मि. परफेक्शनिस्ट आमिर खान (Amir khan)  आणि करीना कपूर (kareena kapoor)  स्टारर 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यानंतर हा सिनेमा आता OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याच्या तयारीला लागला आहे. या OTT रीलीजबाबत आता आमिर खानच्या घोषणेला डावलत निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा आमिर खानसाठी मोठा धक्का आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानने (Amir khan)  'लाल सिंग चड्ढा'  (Laal Singh Chaddha) चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच जाहीर केले होते की, सहा महिन्यांनंतरच त्याचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. पण बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची झालेली अवस्था पाहुन आता निर्मात्यांनी चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमिरच्या निर्णयाला डावलून हा निर्णय घेतल्याने त्याला हा मोठा धक्का मानला जात आहे.  


 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा चित्रपट 11 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर रक्षाबंधनाला टक्कर देण्यासाठी उतरला होता. मात्र प्रेक्षकांनी हा चित्रपट पूर्णपणे नाकारला आहे. त्यामुळे आता OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.अशाप्रकारे लाल सिंग चड्ढा रिलीजच्या दोन महिन्यांनंतरच ओटीटीवर येत आहे.


नेटफ्लिक्सला कितीला विकला?
हा चित्रपट नेटफ्लिक्सला 160 कोटींमध्ये विकला गेल्याचेही बोलले जात आहे. पण आता बातमी येत आहे की, नेटफ्लिक्सने हा चित्रपट 50 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. दरम्यान निर्मात्यांनी या चित्रपटासाठी किमान 125 कोटी रुपये मागत असल्याचे बोलले जात होते. 


दरम्यान 'लाल सिंग चड्ढा'  (Laal Singh Chaddha) ने बॉक्स ऑफिसवर केवळ 60 कोटींची कमाई केली आहे. तर चित्रपटाचे बजेट 180 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठे नुकसान झाले आहे.