मुंबई : भोजपुरी सिनेमांची, गाण्यांची एक वेगळी क्रेझ आहे.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमांमध्ये आपल्या रंगबेरंगी असा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. या सिनेमांतील भडक रंग आणि कथानक यामुळे तो कायम चर्चेत असतो. असाच एक अल्बम सध्या चर्चेत आहे. तो म्हणजे अभिनेता राहुल सिंग. याच्या ‘लाली लगावेलू’ या अल्बममध्ये आपल्याला तो रंगीबेरंगी पाहायला मिळणार आहे. 


 ‘कहिया फिट होइ टाका’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: मोहिनी घातली आहे. सध्या हे गाणे प्रचंड व्हायरल होत असून, प्रेक्षकांकडून त्यास तुफान प्रसिद्धी मिळत आहे. दरम्यान, वेव म्युझिककडून हे गाणे कालच यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आले. ज्याला केवळ २४ तासांत एक लाखापेक्षा अधिक वेळा बघण्यात आले आहे. या गाण्यात निशा दुबेचे ठुमके चांगलेच बघावयास मिळत आहेत. तिच्यासोबत राहुल सिंगनेही चांगलीच धमाल केल्याचे दिसून येते. 



‘कहिया फिट होइ टाका’च्या रिलीजवर निशाने सांगितले की, ‘मला अपेक्षा होती की हा अल्बम प्रचंड पसंत केला जाईल. यातील सर्वच गाणे एंटरटेनिंग आहेत. त्यातील ‘कहिया फिट होइ टाका’ हा गाणे आणखीनच स्पेशल आहे. हा अल्बम नव्या कॉन्सेप्ट आणि प्रेक्षकांच्या आवडी लक्षात घेऊन बनविण्यात आला आहे.’ दरम्यान, प्रेक्षकांकडून अल्बमला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आनंदी असल्याचे निशाने सांगितले.


या अगोदरही असेच भोजपुरी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आले आहेत. या गाण्याला भाषेचं बंधन येत नाही. कोणताही प्रेक्षक हे गाणे आवर्जून पाहतो.