मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala)  मालिकेत 'लाडू'  (Ladoo) म्हणजे बालकलाकार राजवीर सिंह रणजीत गायकवाड (Rajveer Singh Ranjeet Gaikwad)  याने प्रेक्षकांची मन जिंकली होती. मालिकेतील 'लाडू' हे पात्र साकारताना राजवीर याच नावाने लोकप्रिय झाला. अंजली-राणा यांच्या मालिकेत केल्यानंतर आता लाडू म्हणजे राजवीर आपल्याला नव्या मालिकेत दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझा होशील ना' (Maza Hoshil Na) यामध्ये बालकलाकार राजवीर नव्या भूमिकेत दिसणार आहे. राजवीर या मालिकेत पंजाबी मुलाची भूमिका साकारत आहे. 'माझा होशील ना' मध्ये ब्रम्हेंच्या कुटुंबातील एक एक पात्र समोर येत आहेत. 



बंधू मामाचं पंजाबी मुलीशी लग्न झालं असून त्यांना एक मुलगा आहे. याच मुलाचं पात्र बाल कलाकार राजवीर साकारत आहे. या मालिकेतून पुन्हा एकदा 'लाडू' चा अभिनय आणि त्याची धम्माल मस्ती आपल्याला अनुभवता येणार आहे. यामध्ये राजवीर 'बिल्लू' ची भूमिका साकारत आहे. 



लाडूची खास ओळख जाणून घ्या?


या बालकलाकाराचे खरे नाव राजवीर सिंह रणजीत गायकवाड आहे. राजवीरसिंहचे वडील रणजीत गायकवाड हे प्रसिद्ध लिफ्टिंग चॅम्पियन आहेत. वेट लिफ्टिंग मध्ये ते सलग 52 राज्यस्तरीय व 10 राष्ट्रीय तसेच अनेकदा इंटरनॅशनल स्पर्धा खेळले. त्यात त्यांना अनेकदा गोल्ड मेडल मिळाले. आता राजवीरचे वडील रणजीत गायकवाड हे भारतीय सेनेत नोकरी करतात.राजवीरच्या आईचे नाव पल्लवी गायकवाड असून त्या एम. कॉम आणि एम. बी. ए. इन फायनान्स मधून पदवीधर आहेत. काही काळ त्या सांगली जिल्हामध्यवर्ती बँकेत अकाऊंटण्ट म्हणून नोकरी केली.