Shivani Baokar Birthday : छोट्या पडद्यावरील 'लागीर झालं जी' फेम अभिनेत्री शिवानी बावकरचा (Shivani Baokar) आज वाढदिवस आहे. शिवानीच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. शिवानीनं 'लागीर झालं जी' या मालिकेत शीतलीची भूमिका साकारली होती. दरम्यान, लवकरच शिवानी लवंगी मिरची या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण तुम्हाला माहितीये का? की 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरनं (Madhurani Gokhale Prabhulkar) आणि शिवानी बावकरचं एक खास नातं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकरही आणि शिवानी या दोघांचे खास नाते आहे. आता ते दोघं नातेवाईक असतील असं अनेकांना वाटलं असेल! मात्र, हे सत्य नाही तर मधुराणी ही एक अभिनेत्री असण्यासोबतच तिची एक अॅक्टींग अॅकॅडमी आहे. मधुराणी आणि तिचा पती प्रमोद प्रभुलकर या दोघांनी मिळून या अॅक्टींग अॅकॅडमीची सुरुवात केली होती. या अॅक्टींग अॅकॅडमीचं नाव मिरॅकल्स असे आहे. मधुराणी आणि तिच्या पतीसोबत मिळून ही अॅकॅडमी चालवते. या अॅकॅडमीमधून शिवानी बावकरनं देखील अभिनयाचे धडे घेतले आहे. तिच्या या अॅकॅडमीमध्ये अनेक कलाकारांनी अभिनयाचे धडे घेतले आहेत. या कलाकारांच्या यादीत ह्रता दुर्गुळे,  गिरिजा प्रभू, किरण गायकवाड, निखिल चव्हाण यांनी इथूनच शिक्षक घेतले आहे. 



शिवानी बावकर किती घेते मानधन? 


शिवानी बावकर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवानी 'लागीर झालं जी' या मालिकेसाठी 20-25 हजार मानधन घेणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्य म्हटले जाते. 


हेही वाचा : पत्नी नाही तर तिच्यासाठी Prasad Oak नं केलं असं काही..., मंजिरीनंच केला खुलासा


शिवानीनं मराठीसोबत हिंदी मालिकांमध्येही केलयं काम


शिवानीनं मराठी मालिकांसोबतच अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. या यादीत अगले जन्म मोहे बिटिया ही किजो, फुलवा या हिंदी मालिकांचा समावेष आहे. तर मराठी मालिकांविषयी जाणून घ्यायचे झाल्यासं तिनं देवयानी, सुंदर माझं घर यांसारख्या मराठी मालिकांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. आता शिवानी मालिकांपर्यंतच थांबली नाही तर तिनं चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. उंडगा या मराठी चित्रपटात शिवानी दिसली होती.