COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : लागिरं झालं जी या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या ७ ऑगस्टच्या एपिसोडची सुरुवात शीतलच्या घरच्यांसाठी निराशजनक झाली. जप्ती आल्याने घर सोडून जात असताना जमलेल्या लोकांसोबत भय्यासाहेब सुद्धा मज्जा बघायला आलेले असतात. तेव्हा जितू भय्याला काही मदत होईल का असे विचारतो. पण आम्हाला वाटत असूनही मदत करू शकणार नाही असे भय्या म्हणतो. नियमांपलीकडे आम्ही जाऊ शकत नाही असेही पुढे बोलतो. शिवाय बँकचे हप्तेही तुम्ही भरले नाहीत असे भय्या सर्व लोकांपुढे उगाचच जोराने बोलतो.


दरम्यान आम्ही घर सोडून जात आहोत असे नाना बोलतात. व नियमानुसार रितसर कारवाई कसा अशी नाना भय्याला विनंती करतात. तेव्हा भय्या आपली संधी साधतो आणि म्हणतो मी मदत करू का काही? पण नाना साफ नकार देतात. तेवढ्यात शीतल त्या ठिकाणी येते आणि घर सोडून जाणाऱ्या आपल्या घरच्यांना बघून हैराण होते. तेव्हा तिला आपल्या घरावर जप्ती आल्याचे समजते. मी हे घर असं जाऊ देणार नाही असे सांगून शीतल धावत सासरच्या घरी जाते आणि सारा घडला प्रकार जीजीला आणि मामीला सांगते. तेव्हा जीजी समाधानला फोन करायला सांगते. तेव्हा डाव साधून मामी तिला फोन न लावू देता स्वतःच फोन लावण्याचे खोटे नाटक करते. दरम्यान समाधानशी काहीच संपर्क न झाल्याने शीतल मामी जवळ तिचे दागिने मागते, पण ते दागिने मी लॉकरमध्ये ठेवले आहेत असे मामी शीतलला सांगते.


घराच्या काळजीने व्याकुळ झालेली शीतल अगदी रडवेली होते. तेव्हा मामी स्वतः मदतीला येते असे सांगून शितलसह नानांच्या घराकडे जायला निघते. नानांच्या घरात जाऊन पुष्पा मामी खोटेपणाने जोरजोराने बोलू लागते जेणेकरून लोकांपुढे नानांची अब्रू वेशीवर टांगली जाईल असे काहीसे. नानांचे थकलेले हफ्ते मी देते असे सांगून घर परत करा अशी मागणी मामी करते. पण ती वेळ आता निघून गेली आहे असे भय्या मामीला सांगतो. काही वेळाने आपला चढवलेला आवाज कमी करून पुष्पा नानांना म्हणते की, नाना तुम्ही का नाही घेत मदत भय्यासाहेबांची? मामीच्या अशा बोलण्याची संधी साधून भय्या नानांची माफी मागतो व मदत घेतात का हे बघतो, परंतु नाना घर सोडण्याच्या विचारावर ठाम राहतात.


घरावर आलेल्या जप्तीमुळे पुष्पा आणि भय्या साहेबांचे प्लॅन यशस्वी झाले परंतु, घराबाहेर पडलेले शीतलचे कुटुंब कुठे जाणार आणि नाना नानी व घरच्यांसाठी नवे घर शोधण्यासाठी शीतल कोणती शक्कल लढवणार हे बघण्यासाठी लागिरं झालं जी या मालिकेचा उद्याचा ह्रिदयस्पर्शी एपिसोड बघायला विसरू नका.