मुंबई : 'नातं' .. म्हणायला जेवढा सोपा शब्द आहे तेवढाच जपायला कठीण आहे. मग तो जपताना त्यात सुरू होते ती स्वार्थ अन निस्वार्थची लढाई. ह्यात एक हलकी धूसर रेष असते त्यावर तुम्ही कसे उभे आहात? त्यावर तुमची 'सोयरीक' अवलंबून असते आणि तेच आगामी ‘सोयरीक’ चित्रपटात मांडण्यात आल्याचे दिग्दर्शक मकरंद माने सांगतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात लागीर झालं जी मालिकेत आज्याची भूमिका साकारणारा अभिनेता झळकणार आहे.'सोयरीक' या आगामी मराठी चित्रपटात नितीश चव्हाण आणि मानसी भवाळकर ही नवी जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.


‘सोयरीक’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल माध्यमावर प्रदर्शित करण्यात आला असून 11 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


मकरंद माने लिखीत दिग्दर्शित आणि विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने निर्मित 'सोयरीक' या कौटुंबिक धाटणीच्या मनोरंजक चित्रपटात नामवंत कलाकारांची मांदियाळी पहायलामिळणार आहे.


दिग्दर्शक मकरंद माने यांनी नेहमीच वेगळे विषय हाताळले आहेत. 'सोयरीक' मध्येही ते नात्यांबद्दल मंथन घडवणार आहेत.या चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी तर संकलन मोहित टाकळकर यांचे आहे. वैभव देशमुख यांच्या गीतांना विजय गवंडे यांचे संगीत आहे. अजय गोगावले यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे.


नृत्यदिग्दर्शन विट्ठल पाटील तर कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. वेशभूषा अनुतमा नायकवडी तर रंगभूषा संतोष डोंगरे यांनी केली आहे. सहाय्यक दिग्दर्शक अमोल घरत आहेत.