COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका लागीरं झालं जी सध्या आज्या आणि शितलीच्या लग्नामुळे आणखी पसंतीला पडत आहे. आज्या आणि शितलीच्या भांडणापासूनचा ते लग्नापर्यंतचा प्रवास आपण या मालिकेत पाहिलं आहे. झी चोवीस तासची टीम चांदवडीला पोहोचली आणि त्यांनी ते गाव प्रेक्षकांना दाखवलं आहे. 


अजिंक्य हा आर्मीत फौजी म्हणून रूजू झाला आहे. त्याअगोदरच आज्या आणि शितलीचं लग्न झालं. या लग्नाच्या निमित्ताने आज्या आणि शितलीचं घरं सजलं आहे. लग्नाचं वातावरण या घरात पाहायला मिळतं आहे. महत्वाची बाब म्हणजे चांदवडी गावं हे कोणतंही सेट नाही. तर हे खरंखुरं गावं आहे. 40 वर्षांपूर्वी या गावाचं पुर्नवसन झालं आहे. 


आज्याचं मालिकेत जे घर दाखवलं आहे ते एका खऱ्याखुऱ्या फौजीचं घर आहे. त्यामुळे त्या घरात खऱ्या फौजीचा सहवास असल्याचं भासतं. कोणत्याही सेटवर शूट न करता खऱ्या लोकेशनवर शूट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता या चांदवडी गावात चाहत्यांची गर्दी जमते.