लागिरं झालं जी | अजिंक्य पोस्टिंगवर जाताना काय काय घडणार?
लागिरं झालं जी या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या ३० जुलैच्या एपिसोडची सुरुवात शीतलीच्या देव पूजेने होते. माझ्या अजिंक्यला सुखरूप ठेव अशी प्रार्थना शीतल देवाला करते.
मुंबई : लागिरं झालं जी या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेच्या ३० जुलैच्या एपिसोडची सुरुवात शीतलीच्या देव पूजेने होते. माझ्या अजिंक्यला सुखरूप ठेव अशी प्रार्थना शीतल देवाला करते. रात्री सारे एकत्र जेवण करत असताना अजिंक्य आपल्या आजीला गोळ्या चुकवू नकोस असे सांगतो. दरम्यान शीतल अजून जेवण देऊ का विचारते व अजिंक्य नको म्हणतो याने निराश होते.
पुढे अजिंक्य जिऊ काकांकडून बाराशे रुपये येणे आहे याचीही आठवण मामांना करून देतो. तेवढ्यात खोडकरणे मामी म्हणते, तिकडे गेल्यावर आम्हालाही सहजपणे फोन करा नाहीतर विसरून जाल. त्यांच्या बोलण्यावर अज्या म्हणतो रोज कुणालाच फोन करता येणार नाही. वेळ मिळाली की करत जाईन फोन असे अज्या सर्वांना सांगतो. एवढ्यात आजी अज्याला शीतलने केलेल्या जेवणाचे कौतुक करायला सांगते परंतु त्यात काय एवढं बोलून म्हणतो, ती नेहमीच चांगले जेवण करते.
जेवण संपताच अज्या कुणालातरी भेटण्यासाठी पुन्हा घराबाहेर पडतो हे पाहून शीतली रडकुंडीला येते. जेवण झाल्यावर शीतल यास्मिनला फोन करून रडत रडत अज्याशी लग्न केल्याने फसल्याचे सांगतो व तिला लग्न न करण्याचाही सल्लाही देते. शीतल पुढे बोलताना म्हणते बघ ना यास्मिन उद्या तो जाणार आहे मग आज मला वेळ द्यायला नको का? पण माझं काहीच नाही त्याला, दिवसभर घराबाहेर आहे तो.
यास्मिन सारी पोरं सारखीच असतात हे लक्षात ठेव आणि मी केलेली चूक तू करू नकोस व प्रेम करून लग्न तर मुळीच करू नको असे सांगून शीतल फोन ठेवते. तेवढ्यात समोर अजिंक्य येतो आणि शीतल रागाने घरात जाऊन भांड्यांची आदळ आपट करू लागते. तिचा तो रौद्र अवतार बघून आज रात्री काही खरं नाही बोलून अज्या घरी कसाबसा घरी जातो.
रात्री बेडरूममध्ये रागाने शीतल कुणाकुणाला भेटलास हे अज्याला विचारू लागते. बायकोपेक्षा गाव महत्वाचा आहे का तुला? सर्वांच्या शेवटी माझी आठवण आली का तुला? असा जाब तीने आज्याला खडसावून विचारले. परंतु शीतलाच तो राग फारवेळ टिकला नाही. अज्याचे प्रेमळ बोलणे नेहमीची शीतलला मोहित करते हे अज्याला चांगलेच ठाऊक होते.
म्हणून तो शीतलला जवळ घेऊन प्रेमाने बोलू लागला आणि म्हणाला एवढं का रागावलीस माझ्यावर? अरे तुझ्यावर रागावू नाहीतर कुणावर रागावू असे शीतल लगेच बोलून गेली. मग मी गेल्यावर गेल्यावर कुणावर रागावशील असे अजिंक्य म्हणाला आणि ती पार विरघळली व तिला हुंदका अनावर झाला. ती रात्र एकमेकांच्या गोड वाईट गोष्टी बोलण्यातच संपली. तिकडे शीतलच्या आई बाबांची सारी रात्र शीतल्या विचाराच्या चर्चेत निघून जाते. उद्या अजिंक्य पोस्टिंगवर जाताना काय काय घडणार हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड ना चुकता बघा.