Laal Singh Chaddha Vs KGF Chapter 2: भूतकाळात अनेक चित्रपटांच्या रिलीज तारखा एकामागून एक जाहीर केल्या गेल्या. जवळपास 2 वर्षांपासून रिलीज होण्यासाठी रखडलेला अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) देखील रिलीज झाला आहे, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आता सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खानच्या (Kareena kapoor Khan) चित्रपटाच्या नवीन रिलीजची तारीख समोर येत आहे. 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) या बहुप्रतिक्षित चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे. नवीन रिलीज डेटसह, आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' यशच्या 'KGF2'शी टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2022 मध्ये आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' साऊथचा सुपरस्टार यशच्या 'KGF 2' याच दिवशी रिलीज होणार असल्याच्या बातम्या आधीच आल्या होत्या. त्यामुळे दोन्ही चित्रपटांमध्ये जबरदस्त टक्कर अपेक्षित आहे. या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि आता करीना कपूरच्या एका घोषणेने या वृत्तांवरही शिक्कामोर्तब झाले आहे.


बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खानने सोशल मीडियावर 'लाल सिंग चड्ढा'चे पोस्टर शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार 'लाल सिंह चड्ढा' 14 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना करीना कपूर खान लिहिते- 'आम्हाला तुमच्यासोबत आमच्या चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि रिलीजची नवीन तारीख शेअर करताना खूप आनंद होत आहे.'


विशेष म्हणजे 'KGF 2' देखील त्याच दिवशी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. KGF ने याआधीच थिएटरमध्ये खूप गोंधळ घातला होता आणि आता KGF 2 कडूनही अशाच अपेक्षा आहेत.


केजीएफचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. केवळ दक्षिणेतच नाही तर हिंदी पट्ट्यातही या अॅक्शन ड्रामाला उदंड प्रतिसाद मिळाला. अशा परिस्थितीत त्याचा दुसरा भागही सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.