मुंबई : हल्लीच्या जगात सोशल मीडियाचा वापर करणाता तरुण विरळाच समजायला हवा. हल्लीची तरुण पिढी सोशल मीडियाची इतकी अॅडिक्ट झालीये की त्याशिवाय जगणे त्यांचे मुश्किल होते. हल्ली इंटरनेट स्वस्त झाल्याने प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप हे मेसेंजिंग अॅप असतेच. व्हॉट्सअॅप सुरु झाल्यापासून त्याच्या लोकप्रियतेत तसूभर फरक पडलेला नाहीये. मात्र मराठी दुनियेतील प्रसिद्ध टीव्ही स्टार ललित प्रभाकर मात्र या तरुणांपेक्षा काहीसा वेगळा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ललितला व्हॉट्सअॅप वापरायला अजिबात आवडत नाही. खुद्द ललितनेच ही कबुली दिलीये. टाईम्स ऑफ इंडिया डॉट कॉमशी बोलताना ललित म्हणाला, मी आतापर्यंत कधीही व्हॉट्सअॅप वापरले नाही तसेच भविष्यात व्हॉट्सअॅप वापरण्याचा प्लानही नाहीये. मला वाटतं हे वेळखाऊ अॅप्लिकेशन आहे. त्याऐवजी मी काम करण्याला प्राधान्य देईन. त्यामुळे त्यापासून दूर राहिलेलेच बरे. मला नाही वाटतं की व्हॉट्सअॅपमुळे माझं काही अडतयं. त्याच्याशिवाय माझं कामं होतंय. 


लोक व्हॉट्सअॅपवर येण्याबाबत विचारत असतात का असा प्रश्न विचारला असता ललित म्हणाला, हो अनेकदा मला व्हॉट्सअॅपवर येण्यास लोक सांगतात. मात्र त्यांना मी सांगतो की या अॅपने कनेक्ट होण्यापेक्षा मला तुमच्याशी फोनवर बोलायला आवडेल अथवा मला पर्सनली भेटायला आवडेल.


ललित जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरांत पोहोचला होता. आदित्य नावाची भूमिका त्याने साकारली होती. तसेच चि व चि.सौ. का या सिनेमातही त्याने प्रमुख भूमिका साकारली होती.