मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर उद्या दुपारी मुंबईत ३.३० वाजता विलेपार्ले येथील सेवा समाज स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी यांचं शनिवारी दुबईत एका हॉटेलमध्ये अचानक बाथरूमध्ये पडल्याने मृत्यू झाला होता. दुबई पोलिसांना मृतदेहाचे पोस्टमार्टम केल्यानंतर औपचारीकता करण्यासाठी दोन दिवस लावले. दुबई प्रशासनाने श्रीदेवीचा मृतदेह मंगळवारी दुपारी कुटुंबियांकडे सोपवला. रात्री १० वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव शरीर मुंबईत पोहोचेल. 


अंतिम दर्शन


बुधवारी श्रीदेवीवर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिची पार्थिव शरीर मुंबईच्या सेलिब्रेशन क्लब गार्ड्नमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. 


वेळ : सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० पर्यंत


स्थळ : सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब गार्डन नंबर - ५, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी वेस्ट, मुंबई


अंत्ययात्रा


श्रीदेवीची अंत्ययात्रा दुपारी २ वाजता सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबपासून सुरू होईल, जी विलेपार्ले सेवा समाज स्मशान भूमीपर्यंत असेल. 


अंत्यसंस्कार


श्रीदेवीवर अंत्यसंस्कार दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी होईल. 


स्थळ : विलेपार्ले सेवा समाज स्मशान भूमी, एसवी रोड, विलेपार्ले वेस्ट, मुंबई