Lata Mangeshkar यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल
गायिका लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मुंबई : गायिका लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हृदयनाथ यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्यांचा मुलगा आदित्यनाथ मंगेशकर यांनी दिली. एवढंच नाही, तर आता हृदयनाथ यांची प्रकृती स्थिर आहे... असं देखील त्यांनी सांगितलं. पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये हृदयनाथ मंगेशकर यांना डिसचार्च मिळणार असल्याचं देखील त्यांच्या मुलाने सांगितलं आहे.
लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्याचं उद्धाटन आदित्यनाथ मंगेशकर यांनी केलं. सोहळ्यात सर्व पाहुण्यांना संबोधित करताना ते म्हणाले, सोहळ्याचं उद्धाटन हृदयनाथ मंगेशकर यांना करायचं होतं. पण रुग्णालयात असल्यामुळे त्यांना पाहुण्याचं स्वागत करता आलं नाही.
लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला लता मंगेशकर पुरस्कार ( lata mangeshkar award) प्रदान करण्यात आला आहे. मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. मोदींनी हा पुरस्कार देशवासियांना समर्पित केला.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
"लतादीदी वयासोबत कर्मानेही मोठ्या होत्या. सुधीर फडके यांच्यामुळे लतादीदींसोबत ओळख झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत माझं जवळंचं नातं आहे. संगीताची शक्ती लतादीदींमधून दिसली. संगीत एक साधना आहे आणि भावना आहे. लतादीदीचं स्वर हे युवांसाठी प्रेरणा आहे. दीदींनी संगीत जगतावर छाप सोडली", असं मोदी म्हणाले.