मुंबई :  गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. लता दीदी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. आता यासगळ्यावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लता मंगेशकर यांच्या ट्वीटर अकाऊंटवर जाहीर आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. चुकीच्या बातम्या पसरवू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 


आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी प्रार्थना करत आहोत. असंही ट्वीटमध्ये कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे.


डॉ प्रतित समदानी, यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलकडून अपडेट दिले आहेत. लता दीदी यांचं आरोग्य सुधारत असल्याची चिन्हं दिसत असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.



अद्याप भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर अजूनही आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. लता दीदींना कोरोना आणि न्यूमोनियामुळे  ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 


लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांचे हेल्थ अपडेट देखील अनेकदा शेअर केलं आहे.