आताची सर्वात मोठी बातमी, लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मुंबई : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून 92 वर्षीय लता दीदी आयसीयूमध्ये होत्या.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, लताजींची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. यानंतर त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. डॉक्टरांचे पथक त्याच्यावर 24 तास लता दीदींवर लक्ष ठेवून आहे.
पाच दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, "मी लताजींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोललो. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांनी कोरोना आणि न्यूमोनियावर मात केली आहे. यापूर्वी त्या व्हेंटिलेटरवर होत्या, मात्र आज तिचे व्हेंटिलेटरही काढण्यात आले आहे. आता त्यांना फक्त ऑक्सिजन दिला जात आहे. "
पुढे राजेश टोपे म्हणाले, "लताजींनी डोळे उघडले आहेत आणि त्या डॉक्टरांशी बोलत आहेत. कोरोनामुळे त्या अशक्त झाल्या होत्या, पण त्यांची प्रकृती सुधारत आहे."