मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील रुग्णालयात उपचारा दरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर ब्रीज कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. लतादीदींच्या पार्थिवावर रविवारी शिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदी जरी आपल्यात नसल्या तरी त्यांची गाणी आणि किस्से कायम सर्वांच्या स्मरणात राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लतादीदी यांना आपला वाढदिवस साजरा करणं आवडत नव्हतं. त्या नेहमी म्हणायच्या मला वाढदिवस साजरा करायला आवडत नाही. मात्र त्यांच्या वाढदिवसाची एक खास गोष्ट सांगितली. लतादीदी यांच्या घरी नॉनव्हेज का बनवलं जात नव्हतं. 


वडिलांच्या सानिध्यात लतादीदींनी घेतला अखेरचा श्वास, तो प्रसंग डोळ्यात पाणी आणणारा


लतादीदींनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, माझ्या वाढदिवशी बिर्याणी किंवा नॉनव्हेज जेवण केलं जात नाही. यामागे एक विशेष कारण आहे. आमच्या इथे माझ्या वाढदिवशीच श्राद्ध असतं. आई-वडिल आणि मावशीचं 'श्राद्ध' असतं, माझ्या वाढदिवशी 'श्राद्ध'चा शेवटचा दिवस असतो. त्यामुळे घरात असे पदार्थ होत नाहीत असंही लतादीदींनी यावेळी सांगितलं. 


लतादीदी कसा साजरा करायच्या वाढदिवस?
लतादीदी पुढे बोलताना म्हणाल्या की, मला वाढदिवस साजरा करायला आवडत नाही, घरी जे होतं तेच आम्ही खातो. लहान मुलांसाठी तो ठिक आहे. पण लोक येतात भेटतात आणि लोकांच्या आग्रहास्तव केक कापावा लागतो. 


शाहरूख खान थुंकला की फुंकला? काय आहे ही परंपरा