मुंबई : संजय लीला भंसाळी यांची ओळख एक अष्टपैलू कलाकार आणि जाणकार दिग्दर्शक अशी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी संजय लीला भंसाळीच्या   पद्मावतीने अनेक अडथळे पार करून जगभरात बॉक्सवर बक्कळ कमाई केली.  


दिग्दर्शकासोबत उत्तम संगीतकार  


संजय लीला भंसाळी यांनी पद्मावतीच्या दिग्दर्शनासोबतच संगीताचीही जाबाबदारी सांभाळली आहे. यामधील सारीच गाणी लोकप्रिय ठरली. भारताची गानकोकीळा समजल्या जाणार्‍या गायिका लता मंगेशकरांनीही संजय भंसाळींचं कौतुक केलं आहे.  


लता मंगेशकरांनी केलं कौतुक 


लता मंगेशकरांनी भंसाळींचं कौतुक करताना त्यांना संगीत, शास्त्र, संस्कृती यांची उत्तम जाण आहे. भंसाळी यांची राज कपूरसोबत तुलना करण्यात आली आहे. राज कपूर संपूर्ण संगीतकार होते. त्यांना तबला, हार्मोनियम, पियानो येत होतं. राज कपूरनंतर भंसाळी हे दुसरे असे फिल्म मेकर्स आहेत ज्यांना संगीताची जाण आहे. 


घुमरचं कौतुक  


पद्मावत चित्रपटातील 'घुमर' गाण्यामुळे राजस्थानमधील 'घुमर' नृत्य शैली पुन्हा प्रकाशझोकात झाली. दीपिकाचं नृत्य पाहून जगभरातील लोकं त्यावर नाचायला लागली आहेत.