मुंबई : भारतरत्न गान कोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं आहे.  लता मंगेशकर यांना ८ जानेवारीपासून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आठ दशकांहून अधिक काळ भारताचा आवाज बनलेल्या लतादीदींनी ३० हून अधिक भाषांमध्ये हजारो फिल्मी आणि बिगर फिल्मी गाण्यांमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवली. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या गायनाशी संबंधित एक अतिशय मजेशीर घटना आहे. ज्याने हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडवून दिली होती. याचा उल्लेख यतींद्र मिश्रा यांनी त्यांच्या 'लता सुरगाथा' या पुस्तकात केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यतींद्र यांनी लता मंगेशकर यांना रॉयल्टीच्या वादावर प्रश्न विचारला तेव्हा लता मंगेशकर यांनी उत्तर दिलं की, "...आम्ही गायलेल्या गाण्यांच्या बदल्यात संगीत कंपन्यांना त्यांच्या रेकॉर्डच्या विक्रीवर काही नफ्यात वाटा द्यावा, असा मी प्रस्ताव दिला होता." हळुहळु यामुळे एक मोठा वाद निर्माण झाला आणि सगळ्यात जास्त रफी साहेबांचा याला विरोध होता, आपण एकदा गाण्यासाठी पैसे घेतले तर पुन्हा त्यावर पैसे घेण्यात काय अर्थ आहे... मात्र या लढाईत मुकेश भैया, मन्ना डे, तलत महमूद आणि किशोर दा आमच्या समर्थनार्थ उभे होते.


फक्त आशाजी, रफीसाहेब आणि काही गायकांना ही गोष्ट आवडली नाही. मला वाटतं की, रफी साहेबांना या संपूर्ण प्रकरणाची नीट माहिती नव्हती आणि ते गैरसमजाचे शिकार झाले होते...आणि त्याचा परिणाम असा झाला की, मी रफी साहेबांसोबत खूप वर्ष काम केलं नाही आणि राज कपूर जी साठी गाणं गायलं नाही... पण बर्मन दादांमुळे ते शक्य झालं. तेच आमच्यात पडले. आणि आम्ही पुन्हा दोघींनी एकत्र गाणं सुरू केलं. 1967 मध्येच दोघांमधील सगळं काही सुरळीत झालं.