मुंबई : लता मंगेशकर यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात उपचारा दरम्यान अखेरचा श्वास घेतला. भारतीयांना आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध करणारा आवाज हरपल्याची भावना आहे. आज एका युगाचा अंत झाला. लतादीदींच्या आयुष्यातील काही खास आठवणींना आज पुन्हा उजाळा अनेकांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळी त्यांच्या डोळ्यात लतादीदींना पाहून अश्रू आले होते. त्यामागचा एक खास किस्सा आहे. जो फार कमी लोकांना माहीत आहे. लतादीदींनी कवी  प्रदीप यांनी लिहिलेलं 'ऐ मेरे वतन के लोगों' हे गाणं  27 जनवरी, 1963 रोजी गायलं.


लतादीदी यांच्या आवाजातील 'ऐ मेरे वतन के लोगों'  हे गाणं जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऐकलं तेव्हा ते आपल्या डोळ्यातील अश्रू रोखू शकले नाहीत. त्यांच्या या गाण्याने संपूर्ण देशवासीयांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी गायलेलं हे गाणं अजरामर झालं. 



लतादीदी यांचं गाणं ऐकून पंडित नेहरू यांनी त्यांचं खूप कौतुक केलं. या मुलीनं माझ्या डोळ्यात पाणी आणलं असं म्हणत पंडित नेहरू यांनी लतादीदीची गळाभेट घेतली.